मुंबई पोलिसांनी CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना पाठवलं समन्स

दिव्येश सिंह

• 03:52 PM • 09 Oct 2021

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक म्हणजेच सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आलं आहे. SID अर्थात राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल लिक केल्याबद्दल हे समन्स बजावण्यात आलं आहे. बदल्यांच्या प्रकरणातला हा अहवाल होता. या प्रकरणी 14 ऑक्टोबरपूर्वी हजर रहावं असंही सायबर सेलने म्हटलं आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पोलिसांच्या बदल्यासंदर्भातील एक अहवाल […]

Mumbaitak
follow google news

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक म्हणजेच सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आलं आहे. SID अर्थात राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल लिक केल्याबद्दल हे समन्स बजावण्यात आलं आहे. बदल्यांच्या प्रकरणातला हा अहवाल होता. या प्रकरणी 14 ऑक्टोबरपूर्वी हजर रहावं असंही सायबर सेलने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

राज्य गुप्तवार्ता विभागाकडून पोलिसांच्या बदल्यासंदर्भातील एक अहवाल लिक झाला होता. त्या प्रकरणा संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजाविण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यापुर्वी बदल्यांच्या प्रकरणाचा अहवाल लिक झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यापुर्वी काही अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे देखील याप्रकरणी विचारपुस करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं थेट सीबीआयचे संचालक (CBI Director) जयस्वाल यांना समन्स दिल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. सायबर सेलनं हे समन्स ई-मेलव्दारे पाठवलं आहे.

सायबर सेल गेल्या काही महिन्यांपासुन याप्रकरणाचा तपास करीत आहेत. आता थेट सीबीआयच्या संचालकांना दि. 14 ऑक्टोबरपूर्वी या प्रकरणात हजर होण्यास सांगितलं आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेल्या बदल्यांच्या प्रकरणातील अहवाल लिक झाला होता. एवढंच नव्हे तर तो अहवाल सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. त्या प्रकरणाचा सखोल तपास मुंबई पोलिसांचा सायबर सेलतर्फे करण्यात येतो आहे.

    follow whatsapp