नांदेड शहरातील शारदानगर रोडवर रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नांदेड शहरातील शारदा नगर भागातील राज रेसिडेन्सी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशाल धुमाळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
मोटारसायकलवरून तिघेजण आले आणि त्यांनी विशालचा पाठलाग करून धारदार खंजीराने वार करून त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा खून 20000 हजारा साठी झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली. विशालवर खंजीराने निर्दयीपणे हल्ला करणाऱ्या आरोपींपासून विशाल वाचवण्याचा प्रयत्न केला, विशालने आपला जीव वाचवण्यासाठी राज रेसिडेन्सीकडे धाव घेतली, मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विशाल त्याच ठिकाणी पडला, जास्त रक्तस्त्राव झाल्याने, त्याच ठिकाणी विशालचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी विशालच्या वडिलांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तिन्ही अरोपींना 24 तासात अटक केली.
ADVERTISEMENT