मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
उल्हासनगर मध्ये शुक्रवारी दुपारी पूर्व वैमनस्यातून सुशांत गायकवाड नावाच्या व्यक्तीची दिवसाढवळ्या लोखंडी रॉड, तलवार आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेला 24 तासाचा कालावधी उलटला नाही तोच उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये आणखी एका तरुणाच्या हत्येची घटना समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी साई बाबा नगरमध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरली आहे. ज्ञानेश्वर सोनवणे असे मृताचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळी पोलीस हजेरी लावत तापसाला सुरुवात केलीं आहे , मृतदेह उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. उल्हासनगर शहरात गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे, येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
उल्हासनगरच्या नेताजी चौक संकुलातील बंगल्यात जुन्या शत्रुत्वामुळे शुक्रवारी दुपारी काही लोकांनी मिळून, सुशांत गायकवाड नावाच्या तरुणाची दिवसाढवळ्या हत्या केली. या घटनेला 24 तासही उलटत नाहीत तोच आणखी एका तरुणाच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे.
मात्र, या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा गुंडांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. गुंडांना पोलिस प्रशासनाची भीती नाही. तसेच दिवसाढवळ्या हत्या झाल्यास नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होईल यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना वेळीच लगाम घालण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT