स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे येत्या 19 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील 16 जिल्हा परिषद आणि 31 पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीच्या निमित्याने नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे..
ADVERTISEMENT
राज्यात महाविकास आघाडीत सोबत असलेल्या काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांपैकी शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार आणि राजेंद्र हरणे यांनी मुंबई तक ला दिली.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत उमेदवारीवरून चर्चा फिस्कटल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आज आपले उमेदवार जाहीर केले, तिकडे आज भाजपने सुद्धा आपले उमेदवार जाहीर केले आहे.. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख अरविंद गजभिये यांनी स्पष्ट केले आहे..
महत्वाचे म्हणजे भाजपने 16 जिल्हा परिषद आणि 31 पंचायत समितीवर ओबीसी उमेदवार उभे केले आहे.. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तशी घोषणाच केली होती. 16 जिल्हा परिषद आणि 31 पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणूक साठी त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे..काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढत असून त्यांनी सुद्धा आपले उमेदवारांचे अर्ज दाखल केले असल्याची माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रमेश बंग यांनी मुंबई तक सोबत बोलतांना सांगितले आहे .या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात सोबत सत्तेमध्ये भागीदार असलेली शिवसेनेला नागपूर जिल्ह्यात मात्र एकटंच स्वबळावर लढण्याची वेळ आली आहे ..
ADVERTISEMENT