Nagpur MLC Election : बावनकुळेंविरोधात काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

मुंबई तक

• 06:30 AM • 05 Dec 2021

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत आता एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजप नगरसेवकांच्या सहलीला भोयर यांनी आक्षेप घेतल्यामुळे मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तशी ही निवडणूक रंगतदार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक […]

Mumbaitak
follow google news

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत आता एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजप नगरसेवकांच्या सहलीला भोयर यांनी आक्षेप घेतल्यामुळे मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी तशी ही निवडणूक रंगतदार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की, “भाजपचे मतदार आणि त्यांच्या कुटुंबियांना भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीमध्ये सहलीला पाठवले आहे. यावर आक्षेप घेत चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा”. यासाठी छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहीलं आहे.

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चीत मानला जात आहे. परंतू ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी भाजपने आपल्या मतदार व त्यांच्या कुटुंबियांना विविध ठिकाणी सहलीसाठी पाठवलं आहे.

विधान परिषद निवडणुकीतील हा प्रकार राजकीय पक्ष व उमेदवारांना लागू असलेल्या आदर्श आचार संहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप सुद्धा छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे. १० डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे तर १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अश्यात आपले मतदार फुटू नए या भीतीने भाजपने आपले सर्व मतदार विविध ठिकाणी सहलीला पाठविले आहे. हीच सहल आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करत हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp