Nagpur Police: बेरोजगार तरुणांना रेल्वे, SBI आणि WCL चे कॉल लेटर द्यायचे अन्…

मुंबई तक

17 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

योगेश पांडे, नागपूर: रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डब्ल्यूसीएलमध्ये बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी बनावट कॉल लेटरसह पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी दलालांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचा शोध घेत असे आणि त्यांना […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डब्ल्यूसीएलमध्ये बेरोजगार तरुणांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी बनावट कॉल लेटरसह पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी दलालांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचा शोध घेत असे आणि त्यांना रेल्वे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन बनावट कॉल लेटर देत असे.

नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश त्यावेळी केला ज्यावेळी या टोळीचा मुख्य दलाल अमित कोवे याने काही दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या मोबाइलच्या कॉल डिटेल आणि एसएमएसच्या आधारावर पोलिसांनी या टोळीची प्रमुख शिल्पा पालपर्टी, रा. मानेवाडा नागपूर हिच्या सह अन्य दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे आणि WCL चे बनावट कॉल लेटर जप्त केले असून नागपूर जिल्ह्यातील 12 बेरोजगार तरुणांकडून तब्बल 1 कोटी 30 लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.

आरोपी हे बेरोजगार तरुणांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना कॉल लेटर देत होते. ज्यावेळी नोकरी लागल्याच्या आनंदात तरुण येथे जात होते तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दलाल अमित कोवे याला पैसे मागण्यास सुरुवात केली. त्याच तणावातून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

अमित कोवेच्या आत्महत्येनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मोबाइलवरील कॉल आणि एमएमएसच्या आधारे या टोळीचा छडा लावला आहे.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

फसवणूक झालेल्या तरुणांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तवली आहे. यावेळी पोलिसांनी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक झालेल्या अन्य नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी देखील संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार करावी.

पाकिस्तानच्या सीमेवर धडकले बीडचे पोलीस, 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

दरम्यान, जे बेरोजगार तरुणांना या टोळीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांनी आता संबंधित आरोपींना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी तसेच त्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे.

    follow whatsapp