महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. यासाठीच ब्रेक द चेन अंतर्गत महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये पहिल्या दिवशी तरी याला चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय आहे.
ADVERTISEMENT
रस्त्यावर नागरिकांची तुरळक गर्दी बघायला मिळत आहे, जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केलेली असून रस्त्याने येणाऱ्या जाणार्या नागरिकांची विचारपूस करण्यात येत आहे ,जर अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांना सोडण्यात येत आहे अन्यथा नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे .
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगण्यानुसार, नागपुरात 66 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी त्या ठिकाणीसुद्धा नियम मोडणार अथवा गर्दी करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहे
Break The Chain:राज्यात बुधवार रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांची संचारबंदी
अमितेश कुमार म्हणाले “शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येतंय. कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास कारवाई करण्यात येईल आणि अशी कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. पोलीस यंत्रणा सुसज्ज असून यासाठी लोकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळताना दिसतोय.”
ADVERTISEMENT