योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
शार्क टँक इंडिया शोसाठी नागपूरच्या पोहेवाला स्टार्ट अपची निवड करण्यात आली आहे. नागपूरच्या चवदार आणि भन्नाट चवीच्या तर्री पोह्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी ठरली आहे. नागपूरच्या या तर्री पोह्यांना शोच्या मदतीने ग्लोबल करण्याचा आहे.
नागपूरचे सावजी तर्री पोहे जगभर प्रसिद्ध आहेत. हे पोहे वेगवेगळ्या फ्लेवर्समधून चविष्ट बनवण्यासाठी, नागपुरातील चाहुल बालपांडे आणि पवन वाडीभस्मे या दोन तरुणांनी २०१८ मध्ये पोहावाला नावाचा स्टार्ट-अप स्थापन केला.
या दोन युवा उद्योजकांना त्यांचा पोहावाला हा ब्रँड आता जागतिक स्तरावर न्यायचा आहे त्यासाठी त्यांनी शार्क टँक इंडिया या शो समोर आपले बिझनेस मॉड्यूल ठेवलं. चाहुल हा एमबीए पदवीधर असून त्याचा साथीदार पव हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. दोघांनी मिळून ‘पोहवाला’ नावाची छोटी स्टार्ट अप सुरू केली. जी तीनच वर्षात नागपुरात चांगलीच नावरूपास आली.
काहीतरी मोठं करावं या इच्छेने या दोन मित्रांनी मिळून शार्क टँक इंडिया शोमध्ये त्यांच्या स्टार्ट अपचे सादरीकरण केले. या शोच्या माध्यमातून एक कोटी रुपये उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या फंडच्या माध्यमातून यांना नागपूरचा पोहा हा विविध फ्लेवर्स च्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्याची इच्छा आहे.
नागपुरी तर्री पोह्यांची डिश प्रसिद्ध आहे.. तर्री पोहे शहरातील छोट्या-छोट्या स्टॉलमधून विकले जातात, जे लोकांना खूप आवडतात.. पण चाहुल आणि पवन या दोघांनीही पोह्यांना ग्लोबल लुक देण्याचा विचार केला आहे.
नागपुरातील वासुदेव नगर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या या पोहावाला दुकानात सध्या पनीर पोहे, इंदोरी पोहे, साधे पोहे, तर्री पोहे, सावजी पोहे आणि मिसळ पोहे असे सहा विविध प्रकारचे स्वादिष्ट पोहे मिळतात. लवकरच ते ऑरगॅनिक पोहे तयार करणार आहे. ब्लॅक, ब्राऊन आणि रेड ऑरगॅनिक पोहेही लाँच करणार आहेत. पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या शार्क टँक इंडिया शोसाठी नागपुरातील या दोन युवा उद्योजकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
नागपूर म्हटलं की जसं सावजी जेवण आठवतं तसेच आठवतात सावजी तर्री पोहे. तर्री पोहे ही नागपूरची ओळख आहे. गरमगरम वाफाळते पोहे आणि त्यावर गरम गरम सणसणीत तर्री आणि कांदा, थोडी शेव हे पाहून तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल. हेच तर्री पोहे आता ग्लोबल होणार आहेत कारण नागपूरचा पोहावाला हा ब्रांड थेट शार्क इंडिया शोमध्ये चालला आहे.
ADVERTISEMENT