Nana Patole : “फडणवीसांनीच एकनाथ शिंदेंविरुद्ध याचिका दाखल केली होती”

मुंबई तक

• 07:36 AM • 23 Dec 2022

एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासच्या भुखंड नियमितीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा बचाव करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय. टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातही खोटं बोलत आहेत, असं चित्र आपण पाहतोय. एनआयटीचा झोपडपट्टी […]

Mumbaitak
follow google news

एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासच्या भुखंड नियमितीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा बचाव करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.

हे वाचलं का?

टीव्ही 9 या वृत्त वाहिनीशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातही खोटं बोलत आहेत, असं चित्र आपण पाहतोय. एनआयटीचा झोपडपट्टी जमीन घोटाळा त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. मग मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं,’ असा दावा करत नाना पटोलेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.

‘उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः न्यायालयात याचिका दाखल केली होती. जसं सरकार बदललं, तशी त्यांनी याचिका मागे घेतली. त्यांचीच वकील सभागृहात देवेंद्र फडणवीस करत असल्याचं दिसत आहे,’ असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.

‘उद्धव ठाकरेंची होणार चौकशी?’, उमेश कोल्हे प्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप

दिशा सालियन प्रकरण : नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले म्हणाले, ‘त्याचप्रमाणे दिशा सालियनचं प्रकरण आहे. सीबीआयने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली आहे. या मृत्यूचा अहवाल सीबीआयने दिलेला आहे. काल विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, याची चौकशी सीबीआयने केलेली नाही.’

‘जो अहवाल आमच्यासमोर आलेला आहे. त्या अहवालात दिशा सालियन प्रकरणाचाही तपास झालेला आहे. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सोमवारी हक्कभंग प्रस्ताव आणू. हे सगळं जाणून घेऊ,’ असं नाना पटोले यांनी बोलताना सांगितलं.

माणूस कोरोनातून बरा होऊ शकतो, पण भाजपचा विषाणू मेंदूत गेला, तर… -अमोल मिटकरी

‘सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती देणं हक्कभंगाच्या अधिकारात आहे. त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणू आणि त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन,’ अशी भूमिका आता नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यामुळे विरोधक फडणवीसांना सभागृहात घेरण्यासाठी काय रणनीती अखणार याकडे सगळ्याचं लक्ष असेल. दुसरीकडे नाना पटोलेंच्या आरोपावर फडणवीस काय बोलणार यामुळे सोमवारी कामकाज महत्त्वाचं ठरेल.

    follow whatsapp