मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आता जवळजवळ चार महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही हे अत्यंत महत्त्वाचं पद रिकामचं आहे. विधानसभा अध्यक्ष हे पद घटनात्मक आहे. त्यामुळे एवढ्या दीर्घ काळ हे पद रिक्त राहणं योग्य नव्हे अशावेळी आता येत्या अधिवेशनात विधानसभेला नवे अध्यक्ष मिळणार का? असा सवाल सातत्याने विचारला जात आहे. ज्याबाबत आता स्वत: नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
विधानसभा अध्यक्षाची निवडणूक याच अधिवेशनात होणार का? असा सवाल जेव्हा नाना पटोले यांना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘पुढच्या दोन आठवड्यात अधिवेशन होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष जाहीर करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.’
पाहा विधानसभा अध्यक्षपदाबाबत नाना पटोले नेमकं काय म्हणाले:
विधानसभा अध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याबाबत विचारणा केली असता पटोले म्हणाले, ‘पुढच्या दोन आठवड्यात अधिवेशन होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष जाहीर करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे.’
‘कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन याच आठवड्यात तिन्ही पक्षांचे सर्व आमदार उपस्थित राहिले पाहिजे, म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. या पदावर काँग्रेसचेच नाव आहे. परंतु ते आताच सांगता येणार नाही.’
‘ती खुर्ची काही सोपी नाही. अनेक जण त्याला नकार देत आहेत. ज्या दिवशी निवडणूक होईल तेव्हा नाव माहिती पडेलच.’ असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम, बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?
नाना पटोले यांना जेव्हा विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला तेव्हा महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमताने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली होती. आता नाना पटोलेंनंतर कुणाला विधानसभा अध्यक्ष केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाईल तेव्हा महाविकास आघाडीला एका अर्थाने परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची
जबरदस्त गुगली!
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी याच विषयी राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनाही याबाबत विचारण्यात आलं होतं. ज्यावर बोलताना ते असं म्हणाले होते की, ‘कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यामुळे कार्यक्रम पत्रिका येईल तेव्हा आपल्याला नेमका काय कार्यक्रम असेल हे समजेल. ही बैठक कामकाज सल्लागार समितीची होती. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय काही चर्चेला येत नाही.
‘हा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी नेते निर्णय घेऊन आपल्याला कामकाज पत्रिकेच्या माध्यमातून सर्व विषय कळतील.’ असं अनिल परब म्हणाले होते.
ADVERTISEMENT