नांदेड- व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मित्रांनी उभारलं कोव्हिड सेंटर

मुंबई तक

• 12:15 PM • 30 Apr 2021

व्हॉट्सअॅप म्हटलं की एखाद्याला मेसेज करणं किंवा एखादा फॉरवर्ड दुसऱ्याला पाठवणं असंच अनेकांच्या मनात येतं. मात्र नांदेड जिह्ल्यातील लोकांनी व्हॉट्सअपसारख्या मेसेंजरचा योग्य वापर करत एक मोठं काम केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील लोकांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपग्रुपच्या माध्यमातून एक कोव्हिड सेंटर उभारलं आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. रूग्णांना बेड्स तसंच ऑक्सिजन वेळीच […]

Mumbaitak
follow google news

व्हॉट्सअॅप म्हटलं की एखाद्याला मेसेज करणं किंवा एखादा फॉरवर्ड दुसऱ्याला पाठवणं असंच अनेकांच्या मनात येतं. मात्र नांदेड जिह्ल्यातील लोकांनी व्हॉट्सअपसारख्या मेसेंजरचा योग्य वापर करत एक मोठं काम केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील लोकांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपग्रुपच्या माध्यमातून एक कोव्हिड सेंटर उभारलं आहे.

हे वाचलं का?

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. रूग्णांना बेड्स तसंच ऑक्सिजन वेळीच मिळत नाहीयेत. नांदेड जिल्हाही कोरोनाचं हॉटस्पॉट बनला आहे. अशा परिस्थिती नांदेडमधील नायगावात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या ‘आवाज नायगावचा’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने 50 बेड्सचं कोव्हिड सेंटर उभारलं आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शिक्षक,डॉक्टर, वकील, व्यापारी, पत्रकार, नेते तसंच पोलिसांचा समावेश आहे.

‘महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू व्हावं ही मुख्यमंत्र्यांची इच्छा..’

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत बेड्स, रूग्णालय तसंच ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने ‘आवाज नायगावचा’ या ग्रुपच्या अॅडमिनला लोकांच्या मदतीसाठी कोव्हिड सेंटर उभारण्याची कल्पना आली. यानंतर त्यांनी इतरांकडूनही यासाठी मदत व्हावी म्हणून एक पोस्ट लिहीली. या पोस्टचा सकारात्मक परिणाम दिसून आला. यानंतर मोफत सेवा देण्यासाठी डॉक्टरांची एक टीम पुढे आली. याशिवाय काहींनी पैसे दान केले तर कोणी औषधांची मदत केली. ज्यांना शक्य होतं त्यांनी आपपल्या परीने मदतीचा हात पुढे केला.

यावेळी कोव्हिड सेंटरसाठी इमारतीचा प्रश्न समोर असताना माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी सेंटरसाठी त्यांच्या इंग्रजी शाळा उपलब्ध करुन दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने परवानगी घेऊन कोविड सेंटरचं उद्घाटन झालं आणि त्यामध्ये 50 बेड्स बसवण्यात आले. ऑक्सिजन सिलेंडर तसंच अत्यावश्यक औषधांसोबत 24 तास सेवा देणारी रुग्णवाहिकाही तैनात केली आहे. दरम्यान नगरपंचायतीच्या उपाध्यक्षांनी रुग्णांच्या जेवण मिळावं याची जबाबदारी घेतली आहे. सध्या या ठिकाणी 20 रूग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

    follow whatsapp