मी सगळ्यांना पुरून उरलो आहे.शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. माझ्याबद्दल आत्ता अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. कुठे होते काय माहित? अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच त्यामुळे हे काय आहेत मी सांगेन. आत्ता काय बोलणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले नारायण राणे?
मी जे वाक्य बोललो त्याचा काय राग आला? मी जे बोललो ते बोलणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी काय असे शब्द उच्चारले नाहीत? 1 ऑगस्टला बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रम होता. त्याआधी प्रसाद लाड सेनाभवनाबाबत बोलले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले? सेनाभवन बद्दल जो कुणी भाषा करेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही का? दुसरं एक वाक्य आहे योगी आदित्यनाथाबाबत हेच उद्धव ठाकरे बोलले होते. योगी आहे की भोगी? चपलेने मारलं पाहिजे. हाच का शिवसेनेचा सुसंस्कृतपणा? तिसरं वक्तव्य केलं ते अमित शाह यांच्याबद्दल मी आणि अमित शाह यांनी चर्चा केली होती.
निर्लज्जपणाने, निर्लज्जपणाने हा असंसदीय शब्द नाही? विधानसभेत ते बोलले. काय हो माननीय पवारसाहेब किती सालस माणसाला मुख्यमंत्री केलं आहे? एवढी चांगली भाषा बोलणाऱ्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं ते चांगलंच झालं. आम्ही तर राष्ट्राबद्दल अभिमान आहे म्हणून बोललो होतो त्यात चुकीचं काय होतं.
जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना जे टीव्हीवर दाखवत होते, वृत्तपत्रात काय छापून येत होतं ते मला माहित होतं. काही जण माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेत होते मात्र त्यावरही आत्ताही बोलणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामं लोकांना कळावीत म्हणून जन आशीर्वाद यात्रा काढली. केंद्र सरकारच्या योजना लोकांसाठी आहेत म्हणून यात्रा काढली.
देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. तुम्ही सगळे तुमच्या राज्यात जा आणि राज्यात जाऊन जनतेचे आशीर्वाद घ्या असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे मी 19 तारखेपासून जन आशीर्वाद यात्रेला मी सुरूवात केली. परवापासून सिंधुदुर्गापासून यात्रा पुन्हा सुरू होणार, त्यामध्ये खंड पडणार नाही. माझी आशीर्वाद यात्रेत आमच्या विरोधी पक्षांनी लढ्याचं स्वरूप यांनी दिलं. माझ्या पाठिशी भाजप खंबीरपणे उभा आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो.
चिपळूणला प्रचंड गर्दी असं सांगण्यात आलं होतं 17 माणसं होती. त्याच्यापुढे 13 माणसं, प्रचंड प्रतिसाद. आमच्या घरावर किती माणसं आले नाही माहित नाही पण पराक्रमी लोक किती आले होते मी व्हीडिओ क्लिप मिळवेन. घरावर चालून येता? तुम्हाला घरं नाहीत? मुलं बाळं नाहीत? तेवढंच आठवणीत ठेवा असंही राणे यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरलोय हे लक्षात ठेवा. शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच.
काही गोष्टींवर भाष्य करणार नाही, मात्र दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं मला योग्य वाटलं नाही म्हणून आज पत्रकारांना माहिती देण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे. रात्रीपासून तुम्ही माझ्या घराबाहेर वाट बघत होतात. त्यामुळेच मी पत्रकार परिषद घेतो आहे.
ADVERTISEMENT