Narayan Rane यांचं सामना हातात घेऊन संजय राऊत यांना उत्तर, म्हणाले..

मुंबई तक

• 12:46 PM • 25 Aug 2021

नारायण राणे यांना आज सामनामध्ये आलेल्या अग्रलेखाबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सामना हातात घेऊन संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं. ‘संजय राऊत संपादक नाहीत हो, ते काहीतरी बोलतात आणि तुम्ही खुश होता. संजय राऊत फक्त उद्धव ठाकरेंना आवडेल ते लिहितात. त्यांनी मला गँगस्टर म्हटलंय अग्रलेखात पण अशा माणसाला मुख्यमंत्री केलं होतं. मग आत्ता जे […]

Mumbaitak
follow google news

नारायण राणे यांना आज सामनामध्ये आलेल्या अग्रलेखाबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सामना हातात घेऊन संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं. ‘संजय राऊत संपादक नाहीत हो, ते काहीतरी बोलतात आणि तुम्ही खुश होता. संजय राऊत फक्त उद्धव ठाकरेंना आवडेल ते लिहितात. त्यांनी मला गँगस्टर म्हटलंय अग्रलेखात पण अशा माणसाला मुख्यमंत्री केलं होतं. मग आत्ता जे बसलेत मंत्रिपदावर ते कोण आहेत? माझ्याबद्दल लिहिलंय म्हणजे कर्तृत्ववान आहे म्हणून लिहिलं आहे. आत्ता असे आहेत का कुणी? ‘ असाही प्रश्न नारायण राणे यांनी विचारला.

हे वाचलं का?

एवढंच नाही तर नारायण राणे यांनी शिवसेनेला आजही सुनावलं आहे. ज्यांनी मला अपशब्द सुनावले त्यांनी एक गोष्ट विसरू नये की मी सगळ्यांना पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. माझ्याबद्दल आत्ता अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. कुठे होते काय माहित? अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच त्यामुळे हे काय आहेत मी सांगेन. आत्ता काय बोलणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

आणखी काय म्हणाले नारायण राणे?

मी जे वाक्य बोललो त्याचा काय राग आला? मी जे बोललो ते बोलणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी काय असे शब्द उच्चारले नाहीत? 1 ऑगस्टला बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रम होता. त्याआधी प्रसाद लाड सेनाभवनाबाबत बोलले होते.

त्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले? सेनाभवन बद्दल जो कुणी भाषा करेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही का? दुसरं एक वाक्य आहे योगी आदित्यनाथाबाबत हेच उद्धव ठाकरे बोलले होते. योगी आहे की भोगी? चपलेने मारलं पाहिजे. हाच का शिवसेनेचा सुसंस्कृतपणा? तिसरं वक्तव्य केलं ते अमित शाह यांच्याबद्दल मी आणि अमित शाह यांनी चर्चा केली होती.

निर्लज्जपणाने, निर्लज्जपणाने हा असंसदीय शब्द नाही? विधानसभेत ते बोलले. काय हो माननीय पवारसाहेब किती सालस माणसाला मुख्यमंत्री केलं आहे? एवढी चांगली भाषा बोलणाऱ्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं ते चांगलंच झालं. आम्ही तर राष्ट्राबद्दल अभिमान आहे म्हणून बोललो होतो त्यात चुकीचं काय होतं.

    follow whatsapp