अमित शाह यांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं-नारायण राणे

मुंबई तक

• 10:40 AM • 06 Feb 2021

अमित शाह यांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं असं वक्तव्य नारायण राणे यांनी आज केलं आहे. सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “राज्यात असं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असू नये. मी प्रार्थना करेन की अमित शाह महाराष्ट्रात, सिंधुदुर्गात येताच महाविकास आघाडी सरकार जावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांचं इथल्या नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा […]

Mumbaitak
follow google news

अमित शाह यांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं असं वक्तव्य नारायण राणे यांनी आज केलं आहे. सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “राज्यात असं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असू नये. मी प्रार्थना करेन की अमित शाह महाराष्ट्रात, सिंधुदुर्गात येताच महाविकास आघाडी सरकार जावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांचं इथल्या नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारं सरकार यावं.” असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंवरही कडाडून टीका

“ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली, सत्तेसाठी सौदा केला त्यादिवशी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. वैयक्तिक स्वार्थासाठी आणि फक्त मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडलं.” अशी टीका नारायण राणेंनी केली.

मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. काल म्हणजेच 5 फेब्रुवारीलाही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते की, अमित शाह यांना माझ्या कॉलेजच्या परवानगीसाठी दोनदा फोन केला होता. परवा निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा अमित शाह म्हणाले की मै सौ टक्का आऊंगा त्यांनी लगेच माझे निमंत्रण स्वीकारले. अमित शाह हे बुद्धिवान नेते आहेत, माझे आवडते नेते आहेत असंही नारायण राणेंनी म्हटलं होतं.

    follow whatsapp