नरेंद्र चपळगावकर यांची वर्ध्यातील ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई तक

• 12:48 PM • 08 Nov 2022

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाचे अध्य़क्ष म्हणून नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज वर्धा या ठिकाणी पार पडली. यात बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र चपळगावकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंतर सुरेश द्वादशीवर आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश […]

Mumbaitak
follow google news

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाचे अध्य़क्ष म्हणून नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज वर्धा या ठिकाणी पार पडली. यात बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र चपळगावकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ज्येष्ठ लेखक आणि विचारवंतर सुरेश द्वादशीवर आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे नरेंद्र चपळगावकर यांनी?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा मराठी साहित्य याबाबत आपली मतं मांडण्याची मोठी संधी आहे असं मी मानतो. ही संधी दिल्याबद्दल मी मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो असं नरेंद्र चपळगावकर यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केलं आहे.

पुण्यात जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नरेंद्र चपळगावकर यांनी भूषवले होते. तसेच मार्च २०१४ मध्ये झालेल्या नवव्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील चपळगावकर हेच होते. २०११ मध्ये भैरुरतन दमाणी पुरस्कारानं चपळगावकर यांना गौरवण्यात आलं होतं.

    follow whatsapp