नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही आरोपींना साक्षीदारांनं ओळखलं

मुंबई तक

• 03:41 PM • 19 Mar 2022

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालं आहे. पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण […]

Mumbaitak
follow google news

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखलं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालं आहे.

हे वाचलं का?

पुणे महापालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या किरण केशव कांबळे यांनी दोन्ही आरोपींना ओळखले आहे. किरण कांबळे २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही नेमबाज आरोपींना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. सचिन अंदूरे आणि शरद कळसकर अशी साक्षीदाराने ओळखलेल्या आरोपींची नावे आहे.

पुणे विशेष न्यायालयासमोर दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली. यावेळी सीबीआयचे अधिकारीही हजर होते. किरण कांबळे यांनी फोटोवरून दोन्ही आरोपींना ओळखले आहे. या हत्येप्रकरणात सीबीआयनं सचिन अंदुरे याला औरंगाबादमधून अटक केलेली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली होती. ६७ वर्षीय डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलेलं होतं. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही स्थापन केली होती.

दरम्यान, २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. आतापर्यंत ५ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

साक्षीदाराने काय सांगितलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून करण्यात आली होती. त्यावेळी सफाई करणारे एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसलेले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आलं आणि कावळ्यांचा आवाज देखील आला. साक्षीदार तिकडे पाहत असतानाच एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या.

त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो. अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितलं.

सप्टेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने या प्रकरणात एकूण पाच जणांवर आरोप निश्चित केलेले आहेत. यात आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा निश्चित केलेला आहे. युएपीएच्या कलम १६ अंतर्गत न्यायालयाने हे आरोप निश्चित केलेले आहेत. आरोपी क्रमांक ४ असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्यावरही पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

    follow whatsapp