Congress suspended Sudhir Thambe News : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra legislative council) निमित्ताने राज्यात राजकारण (Maharashtra politics) रंगलंय. नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik MLC Election) काँग्रेसनं (Congress) उमेदवारी देऊनही सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. त्यामुळे काँग्रेसमधील विसंवाद आणि महाविकास आघाडीत (MVA) समन्वय नसल्याचं चव्हाट्यावर आलं. सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यानं तोंडघशी पडलेल्या काँग्रेसनं सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचे वडील सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. पाच जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि शेकापला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे, तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. अमरावती आणि नाशिक मतदारसंघ काँग्रेसला मिळाले. अमरावतीत काँग्रेसनं शिवसेनेच्याच नेत्याला पक्षात घेऊन तिकीट दिलं. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची मोठी अडचण झाल्याचं दिसून आलं.
काँग्रेसनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाची घोषणा करण्याबरोबरच एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांची तारांबळ उडाली.
नाशिकमध्ये ‘मविआ’चा प्लॅन ठरला! काँग्रेसच्या नामुष्कीनंतर ठाकरे गट मैदानात
सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्जच भरला नाही. दुसरीकडे त्याचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली होती. अखेर सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे.
Family Man ते निवडणुकीत ट्विस्ट आणणारा नेता, कोण आहेत Satyajeet Tambe?
सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची काँग्रेसकडून चौकशी केली जाणार असून, तोपर्यंत सुधीर तांबे निलंबित असणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT