नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency election 2023) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा उलटफेर बघायला मिळाला. काँग्रेसनं (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe)यांना एबी फॉर्म (AB Form) दिला होता, मात्र ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी अपक्ष (independent) म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक निवडणुकीच्या (Nashik Election) निमित्ताने काँग्रेसमधील (congress) गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. महत्त्वाचं म्हणजे सुधीर तांबेंनी माघार का घेतली याचीही चर्चा होतेय. याबद्दल त्यांनीच भूमिका मांडलीये.
ADVERTISEMENT
सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुधीर तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुधीर तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षातर्फे मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो. पदवीधर मतदारसंघ हा विधान परिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे.”
विधान परिषद निवडणूक 2023 : माघार घेताना सुधीर तांबे काय म्हणाले?
सुधीर तांबे असंही म्हणाले की, ‘घटनेमध्ये आपल्या समाजातील जे पदवीधर आहेत त्यांना एक विशेष हक्क घटनेने प्रदान केला आहे. तेव्हा अशा बुद्धीवंत वर्गाचं.. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आहेत याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील जे पदवीधर आहेत. अशा सुज्ञ लोकांचं प्रतिनिधित्व मला करण्यास मिळालं आहे 13 वर्ष. मी खूप काम केलं आहे या सर्व लोकांसाठी. पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा मी प्रयत्न केला.”
नाशिकच्या हायव्होल्टेज ड्राम्यात विखे पाटलांची एन्ट्री : तांबेंच्या पाठिंब्यावर मोठं भाष्य
‘हे सगळं करत असताना मला जाणवलं की, औद्योगिक क्षेत्र पण आहे ज्यामध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत. तंत्रज्ञान बदलत चाललं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की, या ठिकाणी आता एक तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे’, असं सुधीर तांबेंनी माघार घेताना सांगितलं.
नाशिक विधान परिषद निवडणूक : सत्यजित तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार?
नाशिकची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सुधीर तांबेंना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असाही प्रश्न उपस्थित झाला. त्याला सुधीर तांबेंनी उत्तर दिलंय.
समजून घ्या: शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची निवडणूक का आणि कशी होते?
सुधीर तांबे यांनी सांगितलं की, ‘आपल्याला माहिती आहे की, राज्यात आता तरुण मुलं ही नेतृत्व करतायेत. त्यामध्ये सत्यजीत तांबे हे व्हिजन आणि दृष्टीकोन असलेला एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. म्हणून सत्यजीत तांबे यांचा अर्ज आम्ही त्याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून भरला आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. असं नाही की, कोणी विरोध केला असेल मला वाटत नाही. कारण शेवटी आमच्या पक्षाचं देखील एक धोरण असतं की, तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजेत. तरुणांना संधी देण्याचं काम काँग्रेसने नेहमीच केलं आहे.’
‘दोन अर्ज आम्ही भरले आहेत… थोडंसं काय झालं की, AB फॉर्म हा माझ्या नावाने आलेला होता. थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु इथे काही चिन्ह नसतं.. या निवडणुकीत चिन्ह नसतं.. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे निवडणूक लढवतील’, अशी माहिती सुधीर तांबे यांनी दिली.
अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान
‘कसं असतं की, चांगलं तरुण व्यक्तिमत्व आहे. इथे बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्या पलीकडेही विचार करावा लागतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष हे सत्यजीत यांना मदत करतील’, असं म्हणत सुधीर तांबेंनी भाजपसह इतर पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.
‘भाजपची भूमिका काय आहे ते मला माहित नाही. शेवटी त्यांचा पक्षही मोठा आहे. पण मला काही त्यांची ऑफर नव्हती’, असंही सुधीर तांबे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT