–नीलेश पाटील, नवी मुंबई
ADVERTISEMENT
राजकारण आणि निवडणुकांची झिंग आता अगदी छोट्या मोठ्या निवडणुकीतही उतरताना दिसू लागली आहे. निवडणूक म्हटलं की राजकीय टोकाला जाणं नवीन राहिलेलं नाही. मात्र, नवी मुंबईतील घणसोलीत चक्क सोसायटीच्या ईलेक्शनमध्ये रहिवाशांना मारहाण करण्यात आलाचा संतापजनक प्रकार घडला आहे. माथाडी सोसायटीमध्ये गुंडांनी धिंगाणा घालत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत
नवी मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प जोर धरत आहे. त्यातच महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता असल्याने, या इमारतींचा विकास करण्याचं गाजर दाखवलं जात आहे. यासाठी शिवसेनेनं आघाडी घेतल्यावर भाजप आमदारांनीही कंबर कसली आहे. घणसोली येथे अशाच एका वादात महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गटात जोरदार राडा झाला. या वादात सोसायटीच्या रहिवाशांना दोष नसताना मार सहन करावा लागला.
घणसोली येथील माऊली कृपा सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री काही गुंडांनी येऊन रहिवाशांना दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या हाणामारीत रहिवाशी दिलीप चिकणे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
माऊली सोसायटीमध्ये सोसायटी पदाधिकारी निवडणूक होत असून, यामध्ये दोन पॅनल आमने-सामने ठाकले आहेत. ही सोसायटी माथाडी कामगारांची असली, तरी इमारत पुनर्बांधणीवरून दोन गट माथाडीमध्येच पडले आहेत.
एका गटाला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसऱ्या गटाला भाजपकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सोसायटीवर वर्चस्व मिळवण्याच्या महत्त्वकांक्षेतून दोन गट आमने-सामने आले. पण, हे इतक्यावरच थांबलं नाही. बाहेरील गुंडांच्या मदतीने रहिवाशांना धमकावलं जात असल्याचा आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केला आहे. मारहाणीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT