पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर पडदा पडल्याचं वाटत असतानाच आता मोठा भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठीसमोर पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली रवाना होण्यापूर्वीच पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला. कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्याची घसरण तडजोडीमुळे सुरू होते. मी पंजाबच्या भविष्यासोबत कोणतीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळेच पंजाबच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा देत आहे, असं सिद्धू यांनी राजीनाम्या म्हटलं आहे.
“मी काँग्रेसचा अध्यक्ष असतो, तर कॅप्टन अमरिंदर सिंगांना ३० दिवसातच पक्षातून हाकललं असतं”
नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा ट्वीटही केला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनाम्याचं ट्वीट केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसला देणार झटका?; आज अमित शाह, जेपी नड्डांना भेटणार
सिद्धू यांच्या राजीनाम्याचं वृत्त समोर आल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट केल असून, ‘मी आधीच सांगितलं होतं की, तो माणूस स्थिर स्थिर नाही. सीमेलगत असलेल्या पंजाबसारख्या राज्यासाठी अशी व्यक्ती अजिबात चांगली नाही’, अशी टीका अमरिंदर सिंग यांनी केली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. चन्नी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळावरून नवज्योत सिंग सिद्ध नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा होती. मात्र, त्यांना मिळू शकलं नाही.
ADVERTISEMENT