आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरबरोबर आता भाजपवरही आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या माध्यमांतून लोकांना तुरूंगात टाकलं जात असून, आता समीर वानखेडेच अडचणीत आल्यानं भाजप घाबरली आहेत’, असा दावा मलिक यांनी केला.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि भाजपवर गंभीर आरोप केले. ‘२ ऑक्टोबरला जो व्यक्ती आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता. तो व्यक्ती पोलीस कोठडीत आहे. जो व्यक्ती आर्यन खानसह त्याच्या साथीदारांना जामीन मिळू नये म्हणून ताकद लावत होता. काल त्याने न्यायालयता धाव घेतली. मुंबई पोलिसांनी सुरू केलेला तपास सीबीआय किंवा एनआयएकडे द्यावा. पोलिसांनी सांगितलं की, समीर वानखेडेंना अटक करायचं असेल, तर नोटीस दिली जाईल. त्यामुळे पूर्ण घटनाक्रमच बदलला आहे’, असं मलिक म्हणाले.
‘पकडणारे वाचण्याचे मार्ग शोधत आहेत. पकडून घेऊन जाणारे कोठडीत आहेत. त्यामुळेच मी पिक्चर अभी बाकी आहे म्हणालो होतो. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोठडीत ठेवणं, हा अन्यायकारक आहे. आधी दोन दोघांना जामीन देण्यात आला. नंतर तिघांना जामीन देण्यात आला. एनसीबीकडून खोटं सांगून प्रकरण गुंतागुंतीचं करून ठेवते. हे वानखेडे आल्यापासून झालं आहे’, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
‘एका महिन्याच्या कालावधी दररोज गोष्टी बदल आहेत. वानखेडे यांनी सर्व गोष्टी करून बघितल्या. कुटुंबाला आणलं जात असल्याचं ते म्हणाले होते. पण मी यात त्यांच्या कुटुंबीयांना यात खेचलं नाही. त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल बोललो, कारण ज्यांच्या फोटो आहे, त्यांची इच्छा होती म्हणून मी तो फोटो सार्वजनिक केला. माझा लढा अन्यायाविरुद्ध आहे. बेकायदेशीर फसवण्यात आलेले लोक मुंबईतील तुरुंगात बंद आहेत’, असा दावाही मलिक यांनी केला.
‘आधी मला वानखेडे कुटुंबीयांकडून न्यायालयात खेचण्याची धमकी देण्यात आली. मी त्यांना सांगितलं होतं की, मी खटला लढणार. पण, आता सांगितलं जातंय की मलिकांनी न्यायालयात जावं. न्यायायलयात तर स्वतः समीर वानखेडे गेले आहेत. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे न्यायालयात याचिका केली गेली आणि समीर वानखेडेंबद्दल लिहण्याबद्दल आणि बोलण्याबद्दल बंदी घालण्याची मागणी केली गेली.’
‘मी 70 वर्षांपासून महाराष्ट्रात राहतोय. मग नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. किरीट सोमय्यासोबतच्या भेटीचा फोटो व्हायरल झालाय. माझी जी शंका होती की, जिन्नचा जीव या पोपटात आहे. त्यामुळे पोपट पिंजऱ्यात अडकणार आहे म्हणून हे राक्षसी विचारांचे, भाजपचे लोक घाबरले आहेत. कारण पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी गोष्टी उघड होतील’, असंही मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT