बेड-चटई,बसायला खुर्ची; मलिकांची मागणी कोर्टाकडून मान्य, न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ

विद्या

• 05:45 AM • 22 Mar 2022

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांसोबत केलेल्या व्यवहारावरुन ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांची न्यायालयीन कोठडी २१ मार्चला संपण्यात आली होती, ज्यासाठी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ज्यानंतर न्यायालयाने ही कोठडी ४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. Advocate तारीक सय्यद यांनी कोर्टासमोर नवाब मलिक […]

Mumbaitak
follow google news

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकांसोबत केलेल्या व्यवहारावरुन ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांची न्यायालयीन कोठडी २१ मार्चला संपण्यात आली होती, ज्यासाठी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ज्यानंतर न्यायालयाने ही कोठडी ४ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

हे वाचलं का?

Advocate तारीक सय्यद यांनी कोर्टासमोर नवाब मलिक यांची बाजू मांडली. सय्यद यांनी मलिक यांची कोठडी वाढवून देण्यासाठी नकार दिला. ज्यानंतर कोर्टाने सरकारी वकीलांना आपली बाजू स्पष्ट करायला सांगत मलिकांनी घरच्या जेवणासाठी दाखल केलेल्या अर्जावर आपलं म्हणणं मांडायला सांगितलं. कोर्टाने मलिकांना घरचं जेवण देण्यासंबंधी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून या विषयावरील सुनावणी पुढील तारखेला होईल असं सांगितलं.

यावेळी सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांनी कोर्टाला आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. आपल्या लघवीतून रक्त जात असून दोन्ही पायांना सूज येत असल्याचं मलिकांनी कोर्टाला सांगितलं. ज्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही विरोध न करता जेलच्या नियमांप्रमाणे योग्य तो आदेश देण्यासाठी सहमती दर्शवली. ज्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना बेड-चटई आणि बसण्यासाठी खुर्ची पुरवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीने या सुविधांचा गैरवापर करायचा नाही या अटीवर कोर्टाने मलिकांना ही सवलत दिली आहे.

जर नवाब मलिक या सवलतींचा गैरवापर करताना आढळले तर कोर्ट ही सवलत काढून घेईल असंही विशेष न्यायाधीशांनी सांगितलं. दरम्यान कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करुन दिल्यानंतर मंगळवारी ईडीचं एक पथक कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड परिसरात चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp