राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करीत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती दिली असून, त्यांच्या कथित निकाहनाम्याची माहिती असल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असून, त्यांनी खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे हे राजकीय नेते, कलाकार आणि इतर लोकांचे फोन टॅप करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता मलिकांनी वानखेडे यांचा कथित निकाहनामाची माहिती दिली आहे.
मलिक यांनी तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘7 डिसेंबर 2006, गुरुवारी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांचा निकाह पार पडला होता. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये हा निकाह झाला होता.’
‘वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो’, NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र
दुसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी आणखी माहिती दिली आहे. ‘निकाहमध्ये 33 हजार रुपये मेहर (पतीकडून देण्यात येणारी रक्कम) म्हणून देण्यात आले होते. या निकाहमधील दुसऱ्या साक्षीदाराचे नाव अजीज खान आहे. अजीज खान यासमीन दाऊद वानखेडे यांचे पती आहे, ज्या समीर दाऊद वानखेडे यांची बहीण आहे’, असं मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
समीर वानखेडेंवर प्रचंड खळबळजनक आरोप करण्यात आलेलं ‘ते’ पत्र जसंच्या तसं…
तिसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सबाना कुरेशी यांचा निकाहवेळीचा फोटो ट्वीट केला आहे. त्याचबरोबर एक कागद ट्वीट केलेला असून निकाहनामा असल्याचा दावा नवाब मलिकांकडून करण्यात आला आहे.
NCB चं पाच सदस्यीय पथक दिल्लीहून मुंबईला येणार, समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी होणार?
नवाब मलिक यांनी एक कागद ट्वीट केलेला आहे. हा समीर वानखेडे यांचा जन्मदाखला असल्याचा दावा मलिक यांच्याकडून केला जात असून, त्यात समीर वानखेडेंचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यावरून मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्राबद्दल प्रश्न उपस्थित केले असून, खोटं प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवल्याचा आरोपही केलेला आहे.
ADVERTISEMENT