ADVERTISEMENT
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नयनतारा लवकरच विग्नेश शिवनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवन लग्न करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू होत्या.
दोघंही लग्न करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची लग्नपत्रिका समोर आली आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवन ९ जून रोजी लग्न करणार आहेत.
आधी नयनतारा आणि विग्नेश शिवन तिरुपती येथे लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं.
आता त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.
नयनताराच्या लग्नाची पत्रिका लिक झाली असून, त्यावर लग्नाचं स्थळ महाबलीपुरम आहे.
लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत आहेत.
नयनतारा आणि विग्नेश शिवन २०१५ मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते नानुम रावडी धान चित्रपटाचं शुटिंग करत होते.
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी २०२१ मध्ये कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार सध्या नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या लग्नाची जोरात तयारी सुरू आहे.
नयनतारा आणि विग्नेश शिवन पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.
ADVERTISEMENT