धक्कादायक आरोप! समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांकडून पाळत; NCB ची पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार

मुंबई तक

• 02:07 AM • 12 Oct 2021

काही पोलीस अधिकारी आमचा पाठलाग करत आहेत अशी तक्रार आज NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या वरिष्ठ पोलिसांना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पाठलाग होतो आहे असं NCB ने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला NCB ने एक मोठी कारवाई केली. या कारवाईत त्यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. NCB चे विभागीय संचालक […]

Mumbaitak
follow google news

काही पोलीस अधिकारी आमचा पाठलाग करत आहेत अशी तक्रार आज NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या वरिष्ठ पोलिसांना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पाठलाग होतो आहे असं NCB ने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला NCB ने एक मोठी कारवाई केली. या कारवाईत त्यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक केली.

हे वाचलं का?

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली आहे. मागच्या सहा वर्षांपासून समीर वानखेडे हे त्यांच्या आईच्या कबरीचं दर्शन घेण्यासाठी एका कब्रस्तानात जातात. त्यावेळी दोन पोलीस तिथलं सीसीटीव्ही चेक करत होते असं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आलं आहे. हे दोघे समीर वानखेडे काय करतात यावर लक्ष ठेवून होते असं सूत्रांनी म्हटलं आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक यांना ही बाब लक्षात आली त्यामुळे त्यांनी ही तक्रार मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे हे जेव्हापासून विभागीय संचालक झाले आहेत तेव्हापासून ते ड्रग्ज प्रकरणातल्या हाय प्रोफाईल केसेस हाताळत आहेत.

NCB तर्फे जी कारवाई होते त्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये समीर वानखेडे पुढे असतात. मुंबईच्या क्रूझ पार्टीवर जो छापा मारण्यात आला त्यात शाहरूख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक करण्यात आलं आहे. याआधी सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर जे ड्रग प्रकरण समोर आलं होतं त्यामध्ये कारवाई करण्यात समीर वानखेडे पुढे होते. समीर वानखेडे यांनी त्यावेळी अनेक हायप्रोफाईल सेलिब्रिटीजची चौकशी केली होती.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही NCB ने नऊ महिन्यांपूर्वी अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात ही अटक झाली होती. या अटकेतही समीर वानखेडे यांचाही सहभाग होता. दरम्यान आत्ता जी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करण्यात आली त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB वर गंभीर आरोप केले. हे सगळं प्रकरण म्हणजे एक बनाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर NCB ने पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणतीही जात-पात- धर्म पाहून कारवाई करत नाही, तर जे चुकीचं आणि अयोग्य आहे त्यावरच कारवाई करतो असं समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp