पंढरपूर: ‘लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेत आहेत. आमच्या तिघांच्यामध्ये भांडणं लावण्याचा उपद्व्याप चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.’ असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज (30 मार्च) पंढरपूरमध्ये बोलत होते. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोध नसल्याचं दिसतं आहे.
ADVERTISEMENT
लॉकडाऊनला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विरोध आहे का? असा जेव्हा जयंत पाटलांना सवाल विचारण्यात आला तेव्हा याबाबत जयंत पाटील म्हणाले की, ‘लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेत आहेत. आमच्या तिघांच्यामध्ये भांडणं लावण्याचा उपद्व्याप चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.’
‘ते काय आहे रोज रात्री ते सत्तेची स्वप्न पाहतात. मुख्यमंत्री आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेत असतील तर त्याला कोणीही विरोध करण्याचा प्रश्न नाही.’ असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात Lockdown लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…
‘लॉकडाऊनबाबत भाजप नेते बेजबाबदारपणे विधान करत आहेत. मागच्या वेळेपेक्षा आता अतिशय वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे संकट मोठं आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाचं किती नुकसान होतंय याची देखील सरकारला जाणीव आहे. त्याचा सुवर्णमध्य काढण्याचं काम सुरु आहे. सर्व दैनंदिन व्यवहार सुरु राहिले पाहिजेत. पण गर्दी होता कामा नये. कारण गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव अधिक होतो. त्यामुळे आता राज्यातील सामान्य माणसाला तोशीस लागणार नाही अशाप्रकारे निर्बंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ असंही जयंत पाटील म्हणाले.
उद्धवजी आता परत लॉकडाउन नको ! संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
दरम्यान, यावेळी जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी आणि भाजप नेत्यांवर अतिशय बोचऱ्या शब्दात टीका केली. ‘कोरोनाचं संकट असतात बंगालमध्ये मोठ्या-मोठ्या सभा घेतल्या जात आहेत. खरं तर तिथे कोरोनाच्या मर्यादेत राहून सभा घेतल्या जात आहे की नाही हा प्रश्नच आहे. पण आम्ही मात्र कोरोनाचे नियम पाळून पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचार करु.’ असं म्हणत जयंत पाटलांनी प. बंगालमधील सभा आणि कोरोना संकट याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
‘मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? लॉकडाउनला आमचा कडवा विरोध’
यावेळी जयंत पाटलांनी पंढरपूरमधील पोटनिवडणुकीबाबत बोलताना असं म्हटलं आहे की, ‘भरतनाना भालके यांनी या मतदारसंघात बरीच कामं केली आहेत. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांच्या मागे देखील मतदार उभे राहतील. त्यांना इथे बराच पाठिंबा आहे. तसंच हा मतदारसंघ पवार साहेबांना मानणारा आहे. इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. त्यामुळे पंढरपूरमध्ये विजय आमचाच असेल.’
‘सध्या शरद हे रुग्णालयात दाखल असून लवकरच एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ते वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर पडणार आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाची काळजी आपण करु नका.’ असं जयंत पाटील म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=PRhh6SvbCJoयाच दरम्यान, पत्रकारांनी या पोटनिवडणुकीसंबंधी असाही प्रश्न विचारला की, टप्प्यात घेऊन कार्यक्रम होणार का? तेव्हा याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘योग्य वेळी तुम्हाला सांगेन.’
ADVERTISEMENT