Sharad Pawar यांना ब्रीचकँडी रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई तक

• 08:59 AM • 15 Apr 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 11 एप्रिलला त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 12 एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज शरद पवार यांना डिस्चार्ज […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 11 एप्रिलला त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 12 एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पित्ताशयावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. याधी त्यांच्या पित्ताशयात जे स्टोन झाले होते त्यावर एंडोस्कोपी करण्यात आली. आता त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, सुप्रिया सुळेंसह अजितदादा आणि रोहित पवारही होते हजर

शरद पवारांना या आधी काय झालं होतं?

शरद पवार यांच्या पिताशयाच्या पिशवीत आणि नलिकेत दोन्हीकडे स्टोन होते. पित्ताशयाच्या पिशवीत स्टोनचं प्रमाण जास्त होतं, तसंच पित्ताशयाच्या नलिकेत एक स्टोन होता. मंगळवारी त्यांना होणाऱ्या वेदना वाढल्या.. शरद पवार यांना पोटदुखी आणि पाठदुखी असे दोन्ही त्रास जाणवू लागले. त्यामुळे आम्ही आणखी काही चाचण्या केल्या. त्या चाचण्यांना MRCP टेस्ट असं म्हणतात.

या टेस्टमुळे पित्ताशय, जठर यांचं कार्य.. त्यांच्या नलिकांचं कार्य हे व्यवस्थित सुरू आहे की नाही याची स्पष्ट कल्पना येते. ही चाचणी केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की पित्ताशयाच्या नलिकेत असलेला स्टोन हा त्या नलिकेच्या तोंडाशी आला आहे. त्यामुळे आम्हाला शरद पवारांवर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितलं.

    follow whatsapp