Chinchwad मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याने ठोकला शड्डू! भाजपचा उमेदवार कोण?

मुंबई तक

20 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

Chinchwad Assembly Constituency news : चिंचवड (श्रीकृष्णा पांचाळ) : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतचं निधन झालं. त्यानंतर आता येथून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजप कडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. (ncp […]

Mumbaitak
follow google news

Chinchwad Assembly Constituency news :

हे वाचलं का?

चिंचवड (श्रीकृष्णा पांचाळ) : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतचं निधन झालं. त्यानंतर आता येथून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजप कडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. (ncp leader vitthal Kate announce they will fight against bjp in chinchwad assembly constituency )

अशातच ‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा जो काबील होगा!’ असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी शड्डू ठोकला आहे. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काटे यांनी लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ४५ हजार मतं मिळाली होती आणि ते तीन नंबरवर फेकले गेले होते. त्यानंतर आता पुन्हा पोटनिवडणुकीत काटे यांनी शड्डू ठोकला आहे. 

एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसनेही या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. तर दुसऱ्या बाजूला “राजा का बेटा राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा जो काबील होगा!” अशा आशयाची सूचक आणि बोलकी पोस्ट काटे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. मी माझी तयारी करत आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असं काटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे स्थानिक राजकारणात सर्वपक्षीयांशी चांगले संबंध होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपचा आमदार होईल. पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल असे भाजपचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp