आतातरी सुनील गावस्करने तिथे क्रिकेट अकॅडमी सुरु करावी ! जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले? जाणून घ्या…

मुंबई तक

• 06:30 AM • 16 Sep 2021

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मराठमोळे क्रिकेटपटू सुनील गावसकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निमीत्त ठरलंय महाराष्ट्राचे सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलेलं एक ट्विट. मुंबईच्या वांद्रे भागात तीन दशकांपूर्वी सुनील गावसकर यांना क्रिकेट अकादमीसाठी एक भूखंड राज्य सरकारने दिला होता. या भूखंडाचं काम नंतर सरकारी फाईलींमध्ये अशा पद्धतीने बंद झालं की […]

Mumbaitak
follow google news

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मराठमोळे क्रिकेटपटू सुनील गावसकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निमीत्त ठरलंय महाराष्ट्राचे सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलेलं एक ट्विट. मुंबईच्या वांद्रे भागात तीन दशकांपूर्वी सुनील गावसकर यांना क्रिकेट अकादमीसाठी एक भूखंड राज्य सरकारने दिला होता.

हे वाचलं का?

या भूखंडाचं काम नंतर सरकारी फाईलींमध्ये अशा पद्धतीने बंद झालं की तीन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतरही इथे अकॅडमीची एक वीटही रचली गेली नाही. जाणून घ्या काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर साधारण १९८८ च्या दरम्यान तत्कालिन महाराष्ट्र सरकारने गावसकर यांना वांद्रे येथे २१ हजार ३४८ स्क्वे. फूटाचा भूखंड दिला होता. या भूखंडावर सुनिल गावसकर यांनी इनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करुन तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करावं अशी सरकारची इच्छा होती.

परंतू नियम, अटी-शर्थी अशा सरकारी कामकाजात या भूखंडाची फाईल अशी काही अडकून राहिली की तिकडे ३३ वर्षात एकही काम झालेलं नाही.

दोन वर्षांपूर्वी म्हाडाने सुनील गावसकरांना दिलेला हा भूखंड ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली होती. यासंबंधी सरकारला प्रस्तावही पाठवण्यात आला. परंतू यानंतर पुन्हा त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा प्लॉट पुन्हा एकदा गावसकरांच्या नावे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

दोन वर्षांपूर्वी सुनील गावसकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. परंतू या भेटीमागचा संदर्भ कधी पुढे आला नव्हता. सूत्रांच्या माहितीप्रमाणे गावसकरांची ही भेट याच भूखंडाशी संबंधित होती. MHADA ने दिलेल्या माहितीनुसार सुनील गावसकर यांच्या संस्थेला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाजवळ एक भूखंड क्रिकेट अकादमीसाठी देण्यात आला होता.

हा भूखंड दिल्यानंतर १९९९, २००२ आणि २००७ अशा तीन वर्षांत नियम आणि अटींमध्ये वारंवार बदल झाला. परंतू गावसकरांनी इथे अकादमी सुरु करण्याचं काम हातीच घेतलं नाही. १९८८ साली गावसकर यांना भूखंड देण्यात आल्यानंतर अकादमी सुरु करण्यासाठी त्यांनी अनेक अटी ठेवल्या होत्या अशी माहिती ज्येष्ठ पत्रकारांनी दिली. मध्यंतरी माजी मंत्री आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून, गावसकरांनी मागितलेल्या सवलती, अटी सरकारने वारंवार मान्य केल्या आहेत. यानंतरही गावसकरांकडून करारपत्रावर सही झालेली नाही आणि या जागेवरचं अतिक्रम रोखण्यासाठी काही पावलं उचलली गेली नाहीत असं सांगितलं.

मध्यंतरी माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनीही या जागेवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याची इच्छा दर्शवली होती. परंतू या प्रकरणातही पुढे काहीच हालचाल झाली नाही.

    follow whatsapp