शेतकरी कुटुंबात जन्म ते राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष, जाणून घ्या रुपाली चाकणकरांचा प्रवास

मुंबई तक

• 02:56 AM • 21 Oct 2021

तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदासाठी अखेरीस उमेदवार मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक सामाजिक आणि महिला प्रश्नांवर काम करणाऱ्या आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चाकणकर यांची ओळख आहे. यानिमीत्ताने आपण त्यांचा आजवरचा प्रवास पाहणार आहोत. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदासाठी अखेरीस उमेदवार मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक सामाजिक आणि महिला प्रश्नांवर काम करणाऱ्या आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चाकणकर यांची ओळख आहे. यानिमीत्ताने आपण त्यांचा आजवरचा प्रवास पाहणार आहोत.

महिला प्रश्नांवर रुपाली चाकणकर सोशल मीडियावरुनही नेहमी सातत्याने आपली मत मांडत असतात. दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला.

लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ते महिला प्रदेशाध्यक्ष आणि आता राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष असा चाकणकर यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे.

चित्रा वाघ यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रुपाली चाकणकरांकडे आली.

रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी राहिलेली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

सोशल मीडियावरही रुपाली चाकणकर यांचं फॅन फॉलोइंग मोठं राहिलेलं आहे.

आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

या नवीन जबाबदारीसाठी रुपाली चाकणकरांना ‘मुंबई तक’तर्फे हार्दिक शुभेच्छा…

    follow whatsapp