कोरोना संदर्भातल्या केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स पाहिल्यात का?

मुंबई तक

• 09:48 AM • 28 Jan 2021

कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी निरनिराळे निर्बंध लावण्यात आले होते, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ते कमी केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोना संदर्भातली नवी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. या गाईडलाईन्समध्ये काही निर्बंधांवर सूट देण्यात आली आहे. या गाईडलाईन्स 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहतील. आरोग्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी निरनिराळे निर्बंध लावण्यात आले होते, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ते कमी केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोना संदर्भातली नवी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. या गाईडलाईन्समध्ये काही निर्बंधांवर सूट देण्यात आली आहे. या गाईडलाईन्स 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहतील. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

1) चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, या नव्या गाईडलाईनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेनं चित्रपटगृह सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे.

2) स्विमिंग पूल सर्वांसाठी खुले करणात आले आहेत. याआधी स्विमिंग पूल केवळ खेळाडूंसाठी खुले करण्यात आले होते.

3) नव्या गाईडलाईन्समध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत. ये-जा करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही.

4) कन्टेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी गाईडलाईन्सचं पालन करणं आणि परवानगी घेणं आवश्यक असणार आहे.

5) आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

आता केंद्राच्या या गाईडलाईन्सवर राज्य सरकार काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जर राज्य सरकारने या गाईडलाईन्स लागू केल्या तर मुंबई लोकल सर्वांसाठी खुली होईल.

    follow whatsapp