मुंबई तक: जगभरात सार्स कोव्हिड 2 चे वेगवेगळे व्हेरियंट्स आढळत आहेत. ज्यामुळे जगावरचं कोव्हिडचं भीती दाट होतेय. भारताच्या वेगवगेगळ्या भागांमध्येदेखील हे व्हेरियंट्स आढळत आहेत. भारतात असलेल्या दुसऱ्या लाटेत N440K हा व्हेरियंट आढळतोय जो अत्यंत घातक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
सेंटर फॉर सेल्युलर मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी) यांनी N440K या व्हेरियंटचा शोध लावला हे. तज्ञांच्यामते आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत हा व्हेरियंट 15 टक्के जास्त घातक आहे. तस B1.617 आणि B1.618 या व्हेरियंटपेक्षा जास्त ताकदवान असल्याचंही सांगितलं जातंय.
भारताच्या दक्षिण भागामध्ये N440K म्युटंट पहिल्या लाटेदरम्यान आणि लाटेनंतरही चिंतेचा विषय होता. पण आता समोर येणाऱ्या डेटाच्या आधारे B.1.617 आणि B.1.1.7 (यु.के. आढळणारा व्हेरियंट) हा जास्त चिंतेचा विषय आहे.
जेव्हा महाराष्ट्राच्या डेटाबरोबर याची तुलना केली तेव्हा रिसर्चरना B.1.617 हा व्हेरियंट हा फेब्रुवारीमध्ये मार्च 2021 पेक्षा जास्त वाढला . त्यानंतर तो कमी होऊ लागला. N440K हा नवीन वंशकुळीचा व्हेरियंट वाढताना आढळला. दुसऱ्या लाटेत B.1.617 हा व्हेरियंट वाढताना आढळला असं सीसीएमबी च्या शास्त्रज्ञ दिव्य तेज यांचं म्हणणं आहे. तेज यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र हे सर्वात जास्त फटका बसलेलं राज्य आहे. दुसरी वेव महाराष्ट्रात दक्षिणेकडील इतर राज्यांच्या तुलनेत एक ते दीड महिना आधी सुरू झाली. ज्यावेळी B.1.617 या व्हेरियंटचा विस्फोट झाला. सीसीएमबीने दिलेल्या माहितीनुसार N440K हा दहापट A2a या व्हेरियंटपेक्षात जास्त इन्फेक्शन पसरवणारा व्हेरियंट आहे.
जून 2020 मध्ये D614G हा जास्त आक्रमक आक्रमक होता. त्यानंतर B.1.1.7 (यु.के.), P.1 (ब्राझिल) , B.1.351 (साऊथ आफ्रिका) इथले व्हेरियंट्स जगभर आढळू लागले.
ADVERTISEMENT