बीड : राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेला केजचा नगरसेवक निघाला चंदनचोर

मुंबई तक

• 04:58 PM • 27 Jan 2022

बीड पोलिसांनी गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात चंदनाची चोरी करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. अशाच एका धाडसी कारवाई अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक आरोपी हा केज नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेला नगरसेवक निघाला आहे. बाळासाहेब दत्तात्रेय जाधव असं या नगरसेवकाचं नाव असून त्याचे सोशल मीडियावर पालकमंत्री […]

Mumbaitak
follow google news

बीड पोलिसांनी गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात चंदनाची चोरी करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. अशाच एका धाडसी कारवाई अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक आरोपी हा केज नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेला नगरसेवक निघाला आहे.

हे वाचलं का?

बाळासाहेब दत्तात्रेय जाधव असं या नगरसेवकाचं नाव असून त्याचे सोशल मीडियावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत.

सध्या केज नगरपंचायतीची निवडणुक चांगलीच चर्चेत आली आहे. नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी जनविकास परिवर्तन आघाडी आणि आय काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. २६ जानेवारी रोजी पोलीस सहाय्यक अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवनिर्वाचीत नगरसेवक बाळासाहेब जाधव याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांचे शेतात बाळासाहेब दत्तात्रय जाधव हा बेकायदेशीररित्या काही इसमांना एकत्र जमून परिसरातील चंदनाची झाडे चोरुन तोडून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवायचा. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह २६ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता या ठिकाणी छापा मारला. सदर ठिकाणी एक इसम जागीच मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली असता त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये दोन पांढऱ्या पोत्यांमध्ये २७ किलो चंदनाच्या झाडाचं खोड सापडलं. बाजारभावाप्रमाणे याची किंमत ६७ हजार ५०० रुपये आहे.

    follow whatsapp