नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या देशभरातील लिंकवर छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 11 राज्यांमधून पीएफआयशी संबंधित 106 लोकांना अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्योही धापेमारी करण्यात आली आहे,
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 16 ठिकाणी छापेमारी, 20 आरोपींना अटक
महाराष्ट्र एटीएसने पहाटे औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसी आणि यूएपीएच्या विविध कलमांनुसार बेकायदेशीर कामांमध्ये समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि राज्याविरुद्ध कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
एनआयएने पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्लीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना अटक केली आहे. यातील काही लोकांना एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात आणले जाऊ शकते. अशा परिस्थितीत एनआयए कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
NIA नं अनेक राज्यात केली छापेमारी
एनआयएने यूपी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएला मोठ्या संख्येने पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली, ज्याच्या आधारावर तपास यंत्रणा आज मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी 11 राज्यांमध्ये 106 जणांना अटक केली आहे. पीएफआय आणि त्याच्या लोकांच्या प्रशिक्षण क्रिया, दहशतवादी फंडिंग, लोकांना संघटनेशी जोडण्यासंदर्भात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
केरळमध्ये सर्वाधिक अटक
तपास यंत्रणेने केरळमधून सर्वाधिक 22 जणांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 20, आंध्र प्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, मध्य प्रदेशातून 4, पुद्दुचेरीतून 3, तामिळनाडूमधून 10, यूपीमधून 8 आणि राजस्थानमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान अटक करण्यात आली असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT