महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट त्यांनी सचिन वाझे आणि इतर काही अधिकाऱ्यांना दर महिन्यासाठी दिलं होतं. तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्येही ते ढवळाढवळ करत होते असाही आरोप त्यांच्यावर आहे. ईडीसमोर ते 1 नोव्हेंबरला हजर झाले त्यानंतर चौकशी करून रात्री उशिरा ईडीने त्यांना अटक केली. याच अनिल देशमुख यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
भाजपने अनिल देशमुख यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून टार्गेट केलं होतं. मात्र नितीन गडकरींनी त्यांचे आभार मानले आहेत त्यामुळे नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून सहा हजार पानी आरोपपत्र दाखल
काय म्हणाले नितीन गडकरी?
काटोल नगर परिषदेने रविवारी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घघाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तेव्हा त्यांनी ही देशमुखांचे आभार मानले. नागपूर ते काटोलच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात वन विभागाने खोडा घातला होता. हा मार्ग वाघाचा आहे असं सांगत होते. मी त्यांना सांगितलं लहानपणापासून मी हा रस्ता पाहिला आहे. वाघाला कशाला त्यात कशाला घुसवता?
नितीन गडकरी यांचे राजकारण्यांना खडे बोल, आरक्षण देणार कुठून?
त्यावेळी अनिल देशमुख साहेबांनी मदत केली म्हणून फॉरेस्टचं क्लिअरन्स मिळालं. त्यांचंही मी आभार मानतो. नाही तर क्लिअरन्स मिळतच नव्हतं. त्यामुळे येणाऱ्या काळात अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण होईल, असं सांगतानाच नागपूरमध्येही हा रस्ता चारपदरी करून एक दोन ठिकाणी उड्डाण पूलही करणार आहोत. नागपूरच्या रिंगरोडचं काम कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट करून नवी कॉन्ट्रॅक्टरने करायला घेतलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्व रस्ते पूर्ण होतील, असं गडकरी म्हणाले.
नागपूर ते काटोल या चौपदरीकरणाच्या रस्त्याचाही शुभारंभ झाला आहे. या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं हा वाघांसाठीचा रस्ता आहे. त्यांना म्हटलं माझा जन्म तुमच्या आधीचा आहे. मी 63-64 वर्षाचा झालो. इथं कुठल्या गावात टायगर घुसला नाही. तुम्ही कुठून घुसवला. खोडा घालायचे आणि तकलीफ देण्याचे धंदे कशाला करता? असा सवाल मी त्यांना केला, असं गडकरी यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT