राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून, राज्यातील काँग्रेसचे काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते नितीन राऊत जखमी झालेत. त्यांच्या मुलीने याबद्दलची माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या हैदराबादमध्ये असून, ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. भारत जोडो यात्रेत अनेक नेते सहभागी झाले आहेत. माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊतही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. मात्र, ते जखमी झाले आहेत.
नितीन राऊत यांची कन्या दीक्षा राऊत यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिलीये. भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील (नितीन राऊत) बेशुद्ध झाले. त्यांना डोक्याला छोटी जखम झालीये. ते लवकरच बरे होतील आणि लोक चळवळ महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर त्यात सहभागी होतील, अशी आशा आहे, असं दीक्षा राऊत यांनी म्हटलंय.
Bharat Jodo Yatra : नितीन राऊत जखमी कसे झाले?
भारत जोडो यात्रा हैदराबादेत दाखल झाली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. यात्रेत चालताना झालेल्या धावपळीत नितीन राऊत हे खाली पडले आणि बेशुद्ध झाले. काळी पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याच्यावर मार लागला. त्यामुळे डोळा काळा पडला. तर पायालाही मुका मार लागल्याची माहिती आहे.
नितीन राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या चांगली असून, काँग्रेसचे महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी त्यांची रुग्णालयात जाऊ भेट घेतली.
ADVERTISEMENT