फडणवीसांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिलं, अन्… वाचा नेमकं काय घडलं

मुंबई तक

• 03:38 PM • 15 Jun 2022

योगेश पांडे, नागपूर: नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत.

हे वाचलं का?

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई तत्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलिकडेच रेल्वेमंत्री मुंबईच्या दौर्‍यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना अधिकृतपणे निवेदन देत या नागरिकांची व्यथा मांडली.

यावेळी या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर रेल्वेमंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लगेच दूरध्वनी करून कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. सर्वांच्या कागदपत्रांची पुन्हा नीट पडताळणी करावी आणि तोवर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी सांगितले.

रामबाग, इंदिरानगर, ताटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत. ही जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिल रोजी नागपुरात रेल्वे अधिकार्‍यांना भेटून केली होती.

‘पुरणपोळी’ अन् ‘बिल’: रोहित पवारांचा ‘एका ट्विटमध्ये दोन भाजप नेत्यां’वर निशाणा

त्याचवेळी या प्रश्नात आपण रेल्वेमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते आणि त्यानुसार रेल्वेमंत्र्यांच्या मुंबई दौर्‍यात याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. सुमारे 1600 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. या परिसरात 100 वर्षांपूर्वी एम्प्रेस मिलकडे जाणारी रेल्वेलाईन टाकण्यात आली होती.

गेल्या 75 वर्षांत त्या लाईनचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यानच्या काळात त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले, वीज मंडळाने वीज जोडणी दिली. तीन पिढ्यांपासून ती कुटुंब तेथे राहत आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रेल्वेमंत्र्यांनी झोपडपट्ट्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp