पुण्यात लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध; पाहा काय सुरु, काय बंद

मुंबई तक

• 07:28 AM • 12 Mar 2021

पुणे: पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आता पुण्यात कधीही लॉकडाऊन होऊ शकतं अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. त्यातच आज (12 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये पुण्यात तूर्तास तरी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. मात्र, असं […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आता पुण्यात कधीही लॉकडाऊन होऊ शकतं अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. त्यातच आज (12 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये पुण्यात तूर्तास तरी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

यामुळे पुणेकरांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोनासंबंधी कडक निर्बंध मात्र पुण्यात लागू केले जाणार आहेत.

दरम्यान, कालच (11 मार्च) नागपूरमध्ये कठोर लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्यामुळे पुण्यात देखील लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता. मात्र, तूर्तास तरी लॉकडाऊन न करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवारांनी घेतला आहे.

असं असलं तरी वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता पुणेकरांना कोरोनासंबंधी कडक निर्बंध मात्र पाळावे लागणार आहेत. पुण्यात रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तसेच 31 मार्चपर्यंत शाळा आणि कॉलेज देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

पाहा पुण्यात काय सुरु, काय बंद

  • रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी

  • 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद

  • हॉटेल आणि बार रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद

  • पार्सल सेवा रात्री 11 नंतर

  • मॉल्स, सिनेमागृह रात्री 10 नंतर बंद

  • लग्न समारंभास 50 लोकांनाच परवानगी

  • सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध

  • बाग-बगीचे संध्याकाळी बंद

  • लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोनाचा आढावा बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांना पाचारण केलं होतं. यावेळी त्यांनी पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड येथील आढावा घेतला.

बापरे! महाराष्ट्रात दिवसभरात १४ हजारांपेक्षा जास्त Corona रुग्ण

पुण्यातील कोरोनाची नेमकी स्थिती काय?

सध्या पुणे जिल्ह्यात 21276 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात 2035 कोरोना रुग्ण सापडले होते. तर 9 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाया पुण्यात आतापर्यंत 4,29,973 जणांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यापैकी 8114 जणांचा मृत्यू झाला आहे.पुण्यामध्ये सध्या 62 कंटेन्मेंट झोन आहेत.

Corona च्या बाबतीत बेफिकीरी महाराष्ट्राला पडली महागात, हे आहे कारण

मागील वर्षी याच महिन्यात कोरोनाने देशात शिरकाव केला होता. त्यानंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला होता. पण यामुळे व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकंचं अक्षरश: कंबरडं मोडलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करु नये अशी मागणी पुण्याच्या व्यापारी महासंघाने केली होती.

या सगळ्याचा विचार करता पुण्यात लॉकडाऊन न लावता कठोर नियम लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, यानंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

    follow whatsapp