राजा कायम राहणार पण देशावर महामारी आणि आर्थिक संकट, वाचा काय आहे यंदाची भेंडवळची भविष्यवाणी

मुंबई तक

• 10:48 AM • 15 May 2021

गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या भविष्यवाणीने यंदाच्या वर्षासाठीचा आपला अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे प्रत्येक वर्षी पाऊस-पाणी, पीक याबद्दलचा अंदाज वर्तवला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा महाराष्ट्रात कायम आहे. परंतू यंदा लॉकडाउनमध्ये ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून चंद्रभान महाराज आणि त्यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथे […]

Mumbaitak
follow google news

गेल्या साडेतीनशे वर्षांपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या भविष्यवाणीने यंदाच्या वर्षासाठीचा आपला अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे प्रत्येक वर्षी पाऊस-पाणी, पीक याबद्दलचा अंदाज वर्तवला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा महाराष्ट्रात कायम आहे. परंतू यंदा लॉकडाउनमध्ये ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून चंद्रभान महाराज आणि त्यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथे घट मांडणी केली. आज सकाळी सूर्योदयापूर्वी या घटमांडणीचं निरीक्षण आणि भाकीत यंदा वर्तवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

यंदा राज्यात साधारण पाऊस पडून पीकही साधारणच येईल. देशात नैसर्गिक आपत्ती ओढवेल असंही भाकीत यावेळी वर्तवण्यात आलं आहे. देशाचा राजा कायम राहून, देशावर महामारी आणि आर्थिक संकट अधिक गडद होईल असा अंदाजही यावर्षी वर्तवण्यात आला आहे. जुन महिन्यात पाऊस साधारण राहिल तर जुलै महिन्यात पर्जन्यमान चांगलं राहिल यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचं प्रमाण कमी असेल असं भाकीत या घटमांडणीनंतर करण्यात आलं आहे.

प्रत्येक वर्षी भेंडवळमध्ये घटमांडणीच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते. परंतू यंदा कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाउनचं चित्र लक्षात घेऊन ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. सध्या संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असून येणाऱ्या काळात हे संकट अधिक गडद होण्याचा अंदाज यावर्षी सारंगधर महाराजांनी वर्तवला आहे.

    follow whatsapp