Pune : तडीपार गुंडाची पुण्यात निर्घृण हत्या, पाच जणांवर गुन्हा दाखल

मुंबई तक

• 09:07 AM • 12 Jul 2021

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पु वाडेकरची पाबळ रस्त्यावरील होलेवाडी भागात निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. राजगुरुनगर भागातील टोळीयुद्धातून राहुल वाडेकरची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राहुल वाडेकरवर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री राहुल राजगुरुनगर भागात आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला होता. याचवेळी विरोधी टोळीतल्या […]

Mumbaitak
follow google news

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पु वाडेकरची पाबळ रस्त्यावरील होलेवाडी भागात निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. राजगुरुनगर भागातील टोळीयुद्धातून राहुल वाडेकरची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे वाचलं का?

राहुल वाडेकरवर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री राहुल राजगुरुनगर भागात आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला होता. याचवेळी विरोधी टोळीतल्या काही गुंडांसोबत त्याचा वाद झाला. याच वादातून राहुलची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Pune : ‘पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे’, सल्ला देणाऱ्या प्रतिष्ठीत राजकीय गुरुला अटक

या प्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथकं पाठवली आहेत. २८ वर्षीय राहुलने पुणे जिल्ह्यात आपली दहशत माजवली होती. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे अनेक गुन्हे राहुलवर दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी शिफारस केल्यानंतर त्याच्यावर खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आलं होतं. परंतू आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला असता राहुलची हत्या झाल्यामुळे राजगुरुनगर भागातलं टोळीयुद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

    follow whatsapp