पुण्यासह राज्यभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातलं नियोजन सुरू-अजित पवार

मुंबई तक

• 08:24 AM • 14 May 2021

पुण्यासह राज्यभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नियोजन आम्ही सुरू केलं आहे. केंद्र सरकार जी काही मदत करेल ती मदत आणि इतर मदत राज्य सरकार करणार आहे. तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. अशात ऑक्सिजनचं नियोजन करणं सुरू आहे. 3 हजार मेट्रिक टन हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे. कोणत्याही आरोग्य […]

Mumbaitak
follow google news

पुण्यासह राज्यभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नियोजन आम्ही सुरू केलं आहे. केंद्र सरकार जी काही मदत करेल ती मदत आणि इतर मदत राज्य सरकार करणार आहे. तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. अशात ऑक्सिजनचं नियोजन करणं सुरू आहे. 3 हजार मेट्रिक टन हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे. कोणत्याही आरोग्य सुविधांमध्ये कमतरता भासू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो आहोत.

हे वाचलं का?

जगातून मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात करण्यासाठी औषधं, इंजेक्शन, ऑक्सिजन त्याची विमानांनी तरतूद केली जाते आहे. तो पुरवठा भारत सरकारकडे होते मग त्यांच्याकडून राज्यांना दिला जातो. एकदा त्याबद्दल केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवून कोणत्या राज्यांना किती साधनं वाटली हे स्पष्ट करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारलाही कमी दरात लसी मिळाल्या पाहिजेत-अजित पवार

ग्लोबल टेंडर काढण्याची संमती द्या असं गणेश बिडकर यांनी सांगितलं त्यांना मी सांगू इच्छितो की महापालिकांना संमतीची गरज लागतच नाही. मुंबई महापालिकेने त्यांचं त्यांचं टेंडर काढलं आहे. 45 वर्षे आणि त्यावरील लोकांना लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे मात्र आपल्याकडे तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. तर 18 ते 44 या गटासाठी राज्य सरकार लस खरेदी करतं आहे. पहिल्या टप्प्यात 45 च्या पुढच्या लोकांना पहिला डोस देऊन दुसरा डोस देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तूर्तास राज्यात 18 ते 44 या गटाच्या लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली आहे.

भारत बायोटेकने पुण्याजवळ साधारण 25 एकर पेक्षा जास्त जागा मागितली आहे. ते आपल्याकडे उत्पादन सुरू करणार आहेत. त्या सगळ्या प्रक्रियेसाठी तीन महिने लागतील. महाराष्ट्राला त्या लसीही मिळू शकणार आहेत. निम्म्या लसी त्यांना केंद्राला द्याव्या लागतील मात्र उर्वरित लसी ज्या आहेत त्या आपल्याला द्याव्यात अशीही विनंती करण्यात येते आहे. भारत बायोटेक आणि सिरम यांनी लसींचं उत्पादन वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. लहान मुलांनाही लसी द्याव्यात अशीही मागणी पुढे आली आहेत. काही देशांमध्ये याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे असंही अजितदादांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp