सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने सुरु झालेल्या राजकारणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष राज्याला पहायला मिळतो आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर नितेश राणेंविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईच्या गिरगाव, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स परिसरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आमदार नितेश राणेंचा फोटो लावून त्याखाली, हरवले आहेत शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस दिलं जाईल असा मजकूर लिहीण्यात आला आहे.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ तारखेला झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी नितेश राणेंवरही गुन्हा दाखल करुन याबद्दल त्यांची चौकशी केली आहे. परंतू जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यानंतर ते आऊट ऑफ कव्हरेज झाले आहेत.
मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना कोर्टाने नाकारला जामीन
दरम्यान या पोस्टरबाजीविरोधात भाजपही चांगलीच आक्रमक झाली असून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नितेश राणेंबद्दल आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांविरुद्ध कारवाईच मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणेंनी केलेला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्यामुळे आता यापुढे राणेंना हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.
सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेवर राणेंचंच वर्चस्व, भाजप 10 जागांवर विजयी, महाविकास आघाडीला धोबीपछाड
ADVERTISEMENT