ADVERTISEMENT
Ola Scooter स्कूटर लाँच झाल्यापासूनच या स्कूटरबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
Ola Electric च्या Ola S1 आणि Ola S1 Pro यांना आतापर्यंत बंपर बुकिंग मिळाली आहे.
आता पुढील आठवड्यापासूनच ही ओला स्कूटर आपल्याला मिळू शकणार आहे.
Ola Electric नुकतंच सांगितलं होतं की, ते त्यांनी आपल्या Ola Scooter चं प्रोडक्शन वाढवलं आहे.
15 डिसेंबरपासून कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या होम डिलिव्हरीला सुरुवात करणार आहे.
कंपनीने Ola Scooter च्या विक्रीसाठी पूर्णपणे ई-कॉमर्स मॉडेलचा वापर केला आहे.
यामध्ये कंपनी थेट आपल्या कारखान्यातून लोकांच्या घरी Ola Scooter ची डिलिव्हरी करणार आहे.
याशिवाय या ई-स्कूटरच्या सर्विसिंगसाठी कंपनी आपल्या सर्विस बॉयला थेट ग्राहकाच्या घरी पाठविणार आहे.
Ola S1 ची किंमत 99,999 रुपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1, 29, 999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT