कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने देशात आणि महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. अशात आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं ही रूग्णाच्या डोळ्यांमधून आधी दिसू लागतात. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणं डायरिया ते खोकला अशी अनेक आहेत. मात्र अनेकदा डोळ्यांशी निगडीत समस्या असेल तरीही ओमिक्रॉनचे संकेत असतात असं अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
WHO ने डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या बदलांना लक्षणं म्हटलं आहे. त्यामुळे ही लक्षणं आढळली तर सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन टेस्ट करा. या लक्षणांमुळे ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला असू शकतो असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा
काय आहेत ही सहा लक्षणं?
1)डोळ्याच्या पांढऱ्या भागावर सूज येणं
2)डोळे हलके गुलाबी होणं
3)डोळ्याच्या खाली असलेला भाग सूजणं
4) डोळ्यात अचानक लाली येणं आणि मोठ्या प्रमाणावर डोळे दुखणं
5) डोळ्याने अस्पष्ट, धूसर दिसणं
6) हलक्या प्रकाशामुळेही डोळ्यात पाणी येणं
ही सगळी कोरोनाच्या ओमिक्रॉनची लक्षणं आहेत त्यामुळे ही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे जा. त्यांच्या सल्ल्याने चाचणी करून घ्या असंही डॉक्टरांनी सुचवलं आहे.
काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
भारतीय आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाशी संबंधित डोळ्यांमध्ये होणारे बदल मान्य केले आहेत. एखाद्या माणसाला जर डोळ्यांमध्ये उपरोक्त बदल होत असतील तर कोरोनाच्या ओमिक्रॉनचे ते संकेत असू शकतात. एका स्टडीमध्ये हा दावाही करण्यात आला आहे की 35.8 टक्के निरोगी लोकांच्या तुलनेत 44 टक्के कोरोना रूग्ण हे डोळ्यांशी निगडीत समस्यांचा सामना करत आहेत. त्यामध्ये डोळ्यातून पाणी येणं, लाइट सेन्सिटिव्हिटी ही लक्षणं अगदी कॉमन आहेत.
BMJ Open Ophthalmology मधल्या एका प्राथमिक अभ्यास नुसार कोव्हिडच्या 83 पैकी 17 टक्के लोकांमध्ये डोळ्यांची जळजळ होणं आणि 16 टक्के लोकांमध्ये डोळ्यांमध्ये वेदना होणं ही लक्षणं दिसून आली आहे. जसेजसे रूग्ण बरे होत जातात तसतसे त्यांचे डोळेही ठीक होतात हे पण निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. किंग्ज कॉलेज स्टडी ऑफ लाँग कोव्हिड यांनी दिलेल्या अहवालानुसार कोव्हिड झालेल्या रूग्णांपैकी 15 टक्के लोकांना संसर्गानंतर एक महिन्याने डोळे येणं, डोळ्यात लाली येणं, डोळे सुजणं या समस्या जाणवू शकतात.
ADVERTISEMENT