चित्रपट चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या 16 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये विशेष पर्वणी असणार आहे, कारण भारतात मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्याचं ठरवलं आहे. 16 सप्टेंबर रोजी तिकीटाच्या दरात सवलत देण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे. 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी याचं नियोजन करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
4 हजार चित्रपटगृहांमध्ये बघा 75 रुपयांत चित्रपट
16 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना चित्रपटाच्या एका तिकिटासाठी फक्त 75 रुपये आकारण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे. आता हे चित्रपट तुम्ही पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज, सिटीप्राइड या बड्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे 4 हजार चित्रपटगृहात पाहू शकता. आणि तेही अगदी ७५ रुपयात.
‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’नं आपल्या निवेदनात काय म्हटलं?
“कोरोना आणि त्यानंतरच्या काळात चित्रपटसृष्टीने विविध चढ-उतार पाहिले. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यात जागतिक आणि स्थानिक टेंट पोलच्या पार्श्वभूमीवर चित्रपट ऑपरेटर्समध्ये सकारात्मक संख्या नोंदवली गेली आहे. या तीन महिन्यात ‘केजीएफ: चॅप्टर २’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘भूल भुलैया २’ तसेच ‘डॉक्टर स्ट्रेंज’ आणि ‘टॉप गन: मॅव्हरिक’ यांसारख्या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळाला. आता “राष्ट्रीय चित्रपट दिन” सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र आणेल आणि प्रेक्षकांना संपूर्ण दिवस विविध चित्रपटांचा आनंद लुटता येईल. ज्या प्रेक्षकांनी कोरोना काळानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत चित्रपटगृहं पुन्हा चांगल्याप्रकारे सुरु व्हायला मोठा हातभार लावला, त्यांना धन्यवाद म्हणून मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने तिकिट शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’नं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
बुकिंग अॅप्स अतिरिक्त शुल्क आकारू शकतात
“75 रुपयांना तिकिटे देण्याच्या योजनेत सहभागी होणारे थिएटर्स त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर याबद्दल अधिक माहिती शेअर करतील. तसेच तिकिटांची किंमत फक्त 75 रुपये असेल, पण बुकिंग अॅप्स अतिरिक्त शुल्क आकारू शकतात,” असेही असोसिएशननं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT