मुनसुख हिरेन प्रकरणात विरोधीपक्षात असलेल्या भाजपने मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्या सहभागावरुन प्रश्नचिन्ह निर्माण करत शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला. रात्री उशीरा हिरेन यांच्या मृतदेहावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोस्ट मार्टम करण्यात आलं. परंतू ठाणे पोलीस आणि ATS चे सदस्य नसलेले सचिन वाझे त्यावेळी तिकडे काय करत होते असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
“हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी संशयाची सुई सचिन वाझे यांच्याभोवती फिरते आहे. वाझे हे ठाणे पोलीसांचा भाग नाही, ते ATS मध्येही नाहीयेत…असं असताना ठाण्यात पोस्ट मार्टम सुरु असताना ते तिकडे काय करत होते? वाझे यांच्या उपस्थितीमुळे या प्रकरणातला संशय अधिक बळावतो आहे. याचसाठी या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात यावा अशी मागणी भाजपने केली आहे.” आशिष शेलार विधानसभेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
सर्व महत्वाच्या केसेस वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात?
सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण?
सचिन हिंदुराव वाझे हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला. 1990 साली ते पोलीस दलात सामील झाले होते. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. मात्र दोन वर्षातच म्हणजे 1992 साली त्यांची बदली थेट ठाण्यासारख्या शहरी भागात करण्यात आली होती. ठाण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच चर्चेत होते. दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश करण्यात आला होता.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंची पहिली प्रतिक्रिया..
आपल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात सचिन वाझे यांनी 63 गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं आहे. त्यामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची पोलीस दलात ओळख निर्माण झाली होती. मुन्ना नेपाळी या कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा सचिन वाझे यांनीच केला होता. तेव्हापासून सचिन वाझे हे खूपच चर्चेत आले होते.
ADVERTISEMENT