आज देशातलं वातावरण धर्माच्या बाबतीत बदलतं आहे. आम्ही ते दिवसही पाहिले आहेत जेव्हा भारतातले नेते लपूनछपून मंदिरात जायचे. देशातल्या मोठमोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. ते जायचे पण कॅमेरे आपल्याला पाहणार नाहीत याची काळजी घेऊन गुपचुप जायचे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता हा टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी १३ ट्विट केले.. शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
काय म्हणाले फडणवीस?
आम्ही तो काळ पाहिला आहे जेव्हा मोठमोठे नेते मंदिरात जायला लाजत असत. ते जायचे पण सकाळी किंवा रात्री जायचे. कुणी आपल्याला पाहणार नाही ना? ही शंका त्यांच्या मनात असायची. मंदिरात गेल्याचं कळलं तर सेक्युलर व्होट बँक निघून जाईल. मात्र देशात एक प्रामाणिक पंतप्रधान आले.. अर्थात नरेंद्र मोदी. अध्यात्मिक शक्तीसोबत त्यांनी काम करणं सुरू केलं तेव्हा ते मंदिरातही जाऊ लागले. त्याचा परिणाम हा झाला की त्यानंतर राहुल गांधीही मंदिरात जाऊ लागले. अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा म्हणू लागले. ममता बॅनर्जी चंडी पाठ करू लागल्या. किमान या सगळ्यांना हे कळलं की आपला धर्म ही गर्व करण्याची गोष्ट आहे लाज बाळगण्याची नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलं आहे.
2024 ला महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार येणार-देवेंद्र फडणवीस
आपल्या सनातन संस्कृतीत धर्माचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं आहे. काही लोक या सगळ्याकडे संकुचित विचारसणीतून पाहातात. अनेक लोकांना वाटतं की धर्माचा अर्थ फक्त कर्मकांडाशी जोडलं जातं. आपल्या संस्कृतीत धर्म हा आपल्या आचरणाशी जोडला आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विलेपार्ले येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंची सत्तेसाठीची लाचारी काय? देवेंद्र फडणवीस यांनी थेटच सांगितलं, म्हणाले….
काही वर्षांपूर्वी मी अशाच एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे मी हे वक्तव्य केलं होतं की भारतात राजसत्तेवर धर्मसत्तेचं वर्चस्व असतं. त्यानंतर दोन दिवस मीडियात हे सुरू होतं की राजसत्तेपक्षा मोठा धर्म ठरवला जातो आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या लोकांना आपली संस्कृती आपला धर्म कळलेलाच नाही. मी जे म्हणालो होतो त्याचा अर्थ असा होत नाही की राजाला कुणाच्या आदेशाचं पालन करायचं आहे. मात्र धर्माच्या आधारावर आचरण जे राजे त्या मार्गावर ते मोठे झाले. जे नाही चालले ते बाजूला फेकले गेले. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा फक्त तेवढाच होता.
आज आपण आपल्या संविधानाला याच रूपात पाहू शकतो. आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था आहे ती अशी व्यवस्था आहे की ती आपल्या विचारांना शाबूत ठेवते. आपल्या विचारांची सिद्धता ही आश्रम व्यवस्था आणू शकते. या व्यवस्थेचीही एक मोठी परंपरा आहे. इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तोच खरा आहे असं काही लोकांना वाटतं. मात्र इंग्रजांनी काही गोष्टी हेतुपुरस्सर टाळल्या होत्या. हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती ही भरकटलेली संस्कृती आहे असं वर्णन केलं गेलं. कारण इंग्रजांना हे माहित होतं की जर आपल्या धर्माला मूळापासून हात घातला नाही तर आपल्याला इथे राज्य करता येणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT