अरेच्चा, हे काय? मागवले फुटबॉल स्टॉकिंग्ज… कंपनीनं पाठवली ब्रा

मुंबई तक

• 02:30 AM • 20 Oct 2021

ऑनलाईन शॉपिंग करताना मागवलं एक आणि आलं भलतंच अशा घटना तुम्ही ऐकल्याचं असतील. कधी मोबाईल मागवल्यावर साबण वा विटेचा तुकडा आल्याचंही तुमच्या कानावर आलं असेल. पण एका व्यक्तीने फुटबॉल स्टॉकिंग्ज मागवलेले असताना चक्क त्याला ब्रा पाठवण्यात आले आहेत. ते बदलून देण्यास नकार दिल्यानंतर या व्यक्तीला राग अनावर झाला. एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग साईट असलेल्या मिंत्रा […]

Mumbaitak
follow google news

ऑनलाईन शॉपिंग करताना मागवलं एक आणि आलं भलतंच अशा घटना तुम्ही ऐकल्याचं असतील. कधी मोबाईल मागवल्यावर साबण वा विटेचा तुकडा आल्याचंही तुमच्या कानावर आलं असेल. पण एका व्यक्तीने फुटबॉल स्टॉकिंग्ज मागवलेले असताना चक्क त्याला ब्रा पाठवण्यात आले आहेत. ते बदलून देण्यास नकार दिल्यानंतर या व्यक्तीला राग अनावर झाला.

हे वाचलं का?

एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग साईट असलेल्या मिंत्रा (Myntra) वरून फुटबॉल स्टॉकिंग्ज ऑर्डर केले होते. मात्र, जेव्हा त्याने पार्सल उघडलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. फुलबॉल स्टॉकिंग्जच्या ऐवजी त्याला ब्रा पाठवण्यात आले होते. त्याने ही माहिती ट्विटरवर टाकली आणि त्याची पोस्ट बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाली.

ट्विटरवर @lowkashwala या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन ऑनलाईन शॉपिंग साईट ‘मिंत्रा’ला टॅग करत एक पोस्ट करण्यात आलेली आहे. ज्यात त्या व्यक्तीने काही ऑर्डर केलेल्या वस्तूचे स्क्रिनशॉटही पोस्ट केलेले आहेत. हा फोटो पोस्ट करत चुकीची वस्तू पाठवण्यात आली असल्याचं त्याने म्हटलं आहे. आपण फुटबॉल स्टॉकिंग्ज मागवले होते मात्र, आपल्याला Triumph कंपनीची ब्रा पाठवण्यात आली असल्याची तक्रार त्याने केली.

त्यावर कंपनीने आम्ही हे बदलून देऊ शकत नाही, असं सांगत वस्तू बदलून देण्यास नकार दिल्याने या व्यक्तीला राग अनावर झाला. त्याने मिंत्राकडून देण्यात आलेलं उत्तर ट्वीट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

कंपनीने नकार दिल्यानंतर @lowkashwala या व्यक्तीने इशाराच दिला. ‘फुटबॉल स्टॉकिंग्जची ऑर्डर दिली होती, पण Triumph कंपनीची ब्रा मिळाली आहे. मिंत्रा हे बदलून देऊ शकत नाही. ही वस्तू बदलून देऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी ही ब्रा घालून फुटबॉल खेळायला जाणार आहे’, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

या व्यक्तीने केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरू लागलं आहे. अनेकांनी या ट्वीटवर आपली मतं मांडली आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनी ऑनलाईन शॉपिंगबद्दलच्या तक्रारीही व्यक्त केल्या आहेत. आपापले अनुभव सांगत नेटकऱ्यांनी ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांवर टीकाही केली आहे.

    follow whatsapp