विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार धनंजय मुंडे हे शनिवारी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त नुकसानभागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत राज्य सरकारला धारेवर धरले. एकनाथ शिंदे यांनाही त्यांना प्रश्न विचारला आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशीसंवाद साधण्यासाठी माहुर तालुक्यातील दत्तमांजरी, कुपटी येथील शेतांवर भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणेअजित पवारांनी ऐकून घेत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी पवारांसमोर आपली कैफियत मांडली.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला प्रश्न
यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरलं. एक गोष्ट मला राज्याचेमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगायची आहे की, त्यांनी त्यांचे काम करावे व आम्हाला आमचे काम करू द्यावे. कारण आम्ही राज्याच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करतोय. आमच्या दौऱ्याबद्दलच ते चर्चा करत आहेत. त्यापेक्षात्यांनी त्यांचे काम करावे, असा टोला अजित पवारांनी लगावला. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही हा दौराराजकारणासाठी करत नाहीत. त्यामुळे सरकारनेही राजकारण करू नये. या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे, कारण अतिवृष्टी होऊन बरेच दिवस झाले तरी साधी मदत सोडा पंचनामे सुद्धा झाले नाहीत, असं पवार म्हणाले.
‘302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?’ : अजित पवार
मराठवाडा आणि विदर्भात पुराच्या संकटामुळे मोठं नुकसान झालं आहे. लोकांची घरे पडली, पिकांचं नुकसान झालं, जनावरे दगावली त्यामुळे त्यांना तात्काळ 5 हजार रुपये मदत देणे गरजेचे होते. माहूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळाली नाही, आता माझ्या कुटुंबाचं काय होणार, या दुःखापोटी आत्महत्या केली. आता एकनाथराव तुम्ही मला सांगा 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?’ असा प्रश्न अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आता त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवेला मदत तरी द्या. का शेतकऱ्यांनी पहिलं आत्महत्या करायची, मग तुम्ही लक्ष देणार आहात का? असा घणाघाती सवाल अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना केला.
‘दौरे महत्वाचे की माणसांचे जीव?’
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. यावरूनचअजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात, पण तुम्हीसगळीकडे फिरत आहात. तो तुमचा अधिकार आहे पण, त्या आधी संकटात असलेल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्नकरा ना! त्यांना आत्मविश्वास द्या, असा सल्ला अजित पवारांनी दिला. मात्र 15 दिवस झाले तरी संकटातून बाहेर काढू, असं म्हणतात. पण अजून पंचनामे नाही. नुसतेच इकडे-तिकडे फेऱ्या आणि दौरे सुरु आहेत. तुमचे दौरे महत्वाचे आहेत कीमाणसांचे जीव, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT