सध्या ईडीच्या रडारवर विरोधी पक्षाचे नेते असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या निशाण्यावर आहेत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी सध्या ईडी करत आहे. तर रेल्वे भरतीघोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांचे ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे. राहुल गांधी यांचीही चौकशी ईडीने केली.
ADVERTISEMENT
सोनिया गांधी, पार्थ चॅटर्जी, लालूप्रसाद यादव, संजय राऊत यांच्याविरोधात ईडी सक्रिय
यासह पश्चिम बंगाल येते झालेल्या शिक्षक भरती प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांनाईडीने अटक केली आहे. तृणमूलच्या इतर आमदारांची देखील चौकशी ईडी करत आहे. तर सध्या संकटात असलेल्याशिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले आहे. या एकूणच घटनांकडे पहिले तर केंद्रीय एजन्सी सध्या विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करताना दिसत आहे.
एकीकडे ईडीची विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई सुरु आहेत तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने ईडीच्या विरोधात दाखलयाचिका फेटाळून लावली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारीमहत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यातंर्गत अटक करण्याचे ईडीचे अर्थात सक्तवसुलीसंचलनालयाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत.
ईडीकडून होत असलेल्या अटक, संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईसही रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे ईडीला आणखी बळ मिळाले आहे. ईडीचा वापर राजकीय कारणांसाठी होत असल्याचा आरोप अनेकदाकरण्यात आला आहे. मागील 17 वर्षात पाच हजार प्रकरणातील 23 गुन्ह्यात दोषींना शिक्षा झाली आहे, अशी माहितीसमोर आली आहे.
काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली नॅशनल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र सुरु केले होते. त्याला चालवण्याची जबाबदारीअसोसिएट जर्नल लिमिटेड नावाच्या कंपनीला दिली होती. आर्थिक घाट्यामुळे 2008 साली हे वृत्तपत्र बंद करण्यातआले. तेंव्हा काँग्रेसने एजीएलला निर्व्याजी 90 कोटी रुपये पार्टी फंडातून दिले असल्याचे बोलले जाते. नंतर सोनियाआणि राहुल गांधी यांनी यंग इंडियन नावाची कंपनी सुरु केली. एजीएलला दिलेल्या 90 कोटी रुपयांच्या बदल्यातकंपनीची 99 टक्के भागेदारी मिळाली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी दिली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे.
रेल्वे भरती घोटाळा नेमका काय आहे
लालू प्रसाद यादव हे 2004 ते 2009 साली रेल्वेमंत्री होते. यादरम्यान रेल्वे भरतीत घोटाळा झाला होता. त्याचप्रकरणीलालू यादव यांचे ओएसडी राहिलेले भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे. पाटणा आणि दरभंगा येथील चारठिकाणी छापा टाकला आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना भरतीदरम्यान जमीन आणि प्लॉटच्या बदल्यात नोकरी दिलीगेली असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लालू यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल असून यापूर्वीचत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीत पार्थ चॅटर्जी जाळ्यात
ममता बॅनर्जी सरकारमधील सध्याचे उद्योगमंत्री आणि पूर्वीचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. चॅटर्जी शिक्षणमंत्री असताना शिक्षक भरतीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला होता. याचप्रकरणी ईडीने चॅटर्जी यांच्याठिकाणावर छापेमारी केली, तसेच पार्थ चॅटर्जी यांची 6 तास चौकशी करत त्यांना अटक केली. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्या घरून 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच ईडी तृणमूलच्या इतर आमदारांची चौकशी करत आहे.
संजय राऊतांना ईडी कार्यालयात पुन्हा हजर राहण्याचे समन्स
शिवसेना खासदार संजय राऊत यांची मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. मुंबईतील गोरेगाव स्थित पात्राचाळ पुनर्विकास कामात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक झाली आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. याप्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी राऊत यांची ईडी कार्यालयात 10 तास चौकशी झाली होती. आता त्यानंतर पुन्हा ईडीने राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावले आहे.
ADVERTISEMENT